प्रयागराज येथील एका पोलिसाकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती असल्याचा माहिती अधिकार कार्यकर्त्याचा आरोप

‘या आरोपानुसार एका पोलीस शिपायाकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती असेल, तर तो पोलीस शिपाई म्हणून का काम करील ?’ असा प्रश्‍न उपस्थित होतो. त्यामुळे वरिष्ठ पोलिसांनी याची सखोल चौकशी केली पाहिजे !

(प्रतिकात्मक छायाचित्र)

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – प्रयागराज जिल्ह्यातील एका पोलीस शिपायाकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती आहे. त्याच्याकडे महागड्या गाड्या आणि सदनिका, तसेच भूमीही आहे. त्याच्या संपत्तीची चौकशी करावी, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते नूतन ठाकूर यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना पत्र पाठवून केली आहे.