
गोंडा (उत्तरप्रदेश) – येथील टिकरी गावामध्ये एका घरात जेवण बनवत असतांना गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन झालेल्या अपघातामध्ये २ घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. तसेच दोन्ही घरांतील १५ जण ढिगार्याखाली दबले जाऊन ८ जणांचा मृत्यू झाला. घायाळ झालेल्या ७ जणांना उपचारांसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. ढिगार्याखाली एक लहान मुलगा दबला गेला असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
UP: Four Children Among Eight Dead Following Gas Cylinder Explosion In Gondahttps://t.co/Fa4XgulqCL
— ABP LIVE (@abplivenews) June 2, 2021
गावातील नुरुल हसन यांच्या घरात हा स्फोट होऊन हा अपघात घडला. या स्फोटात शेजारी फकिरे यांचेही घर पडले. गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत असले, तरी स्फोटामागचे नेमके कारण समजू शकलेले नाही. स्फोटाची तीव्रता पहाता लगेच अंदाज लावणे कठीण असून तपासणी करण्यासाठी फॉरेंसिक टीम घटनास्थळी पोचली आहे.
जन्महिंदूंना कर्महिंदू, जागृत हिंदू आणि संघटित हिंदू बनवूया ! – शंभू गवारे, हिंदु जनजागृती समिती
लोहियानगर (पुणे) येथील आधुनिक वैद्यांनी पिस्तुल दाखवून दिली जिवे मारण्याची धमकी !
मुंबई, पुणे आणि नागपूर यांसह अनेक शहरांत तरुणांचे आंदोलन !
Mumbai Police : मुंबईत २३ जुलैपासून ६ ऑगस्टपर्यंत जमावबंदी
Chargesheet Against ‘Al Halimi Foundation’ : ‘अल् हलिमी फाऊंडेशन’विरुद्ध १४ सहस्र पानांचे दोषारोपपत्र प्रविष्ट !
Railway Tickets Seized : ५ वर्षांत १ सहस्र ६७६ गुन्हे नोंद : कोट्यवधी रुपयांची रेल्वे तिकिटे जप्त