(म्हणे) ‘येशू ख्रिस्ताचा आशीर्वाद आणि दया यांमुळे आपण कोरोनाला पराजित करू शकलो !’

तेलंगाणा राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक जी. श्रीनिवास राव यांचे विधान !

तेलंगाणा राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक जी. श्रीनिवास राव

भाग्यनगर (तेलंगाणा) – आम्ही कोरोनाला स्वतःच्या कर्तृत्वावर नाही, तर येशू ख्रिस्ताचा आशीर्वाद आणि दया यांमुळे पराजित केले. प्रभु येशूमुळेच भारताने इतकी प्रगती केली आहे, असे विधान तेलंगाणा राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक जी. श्रीनिवास राव यांनी नाताळानिमित्त कोठागुडेम येथील एका कार्यक्रमात केले.

जी. श्रीनिवास राव या विधानावरून टीका होऊ लागल्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला.

राव म्हणाले की, माझी प्रतिमा अपकीर्त करण्यासाठी काही जणांनी माझे भाषण चुकीच्या पद्धतीने प्रसारित केले. मी लोकांना माझ्या भाषणाचा पूर्ण व्हिडिओ पहाण्याची विनंती करतो. मी इतकेच म्हटले होते की, सरकारचे प्रयत्न, आरोग्य कर्मचारी, सर्व धर्मियांची प्रार्थना यांमुळे आपण कोरोनाला पराजित करू शकलो.

संपादकीय भूमिका

भारतातील प्रत्येक धर्माच्या व्यक्तींना तिच्या श्रद्धास्थानामुळे आपण कोरोनाला पराजित करू शकलो, असे वाटू शकते; मात्र राव यांच्याप्रमाणे अन्य धर्मीय कधी ‘प्रभु श्रीरामामुळे आपण कोरोनाला पराजित करू शकलो’, असे म्हणतील का ?