सनातन संस्‍था आध्‍यात्मिक क्षेत्रात अद़्‍भुत कार्य करत आहे ! – प्रमुख आध्‍यात्मिक वेत्ता आर्ष विद्या तपस्‍वी श्री बंगरय्‍या शर्मा

‘तेलुगु सनातन पंचांग २०२३’च्‍या ‘अँड्रॉईड’ आणि ‘आय.ओ.एस्.’ यांच्‍या ‘अ‍ॅप’चे लोकार्पण

‘तेलुगु सनातन पंचांग २०२३ अँड्रॉईड अ‍ॅप’चे प्रकाशन करतांना श्री बंगरय्‍या शर्मा

भाग्‍यनगर (तेलंगाणा) – येथील प्रमुख आध्‍यात्मिक वेत्ता आर्ष विद्या तपस्‍वी श्री पसर्लपती श्री बंगरय्‍या शर्मा यांच्‍या शुभहस्‍ते ‘तेलुगु सनातन पंचांग २०२३’च्‍या ‘अँड्राईड’ आणि ‘आय.ओ.एस्.’ यांच्‍या ‘अ‍ॅप’चे लोकार्पण २९ डिसेंबर २०२२ या दिवशी करण्‍यात आले. या वेळी सनातन संस्‍थेचे सौ. विनुता शेट्टी आणि श्री. नीळकंठ नाईक उपस्‍थित होते. तत्‍पूर्वी त्‍यांनी श्री बंगरय्‍या शर्मा यांच्‍या निवासस्‍थानी त्‍यांची भेट घेत सनातन संस्‍थेचा उद्देश आणि कार्य यांची माहिती दिली अन् त्‍यांचे आशीर्वाद घेतले.

या वेळी श्री बंगरय्‍या शर्मा म्‍हणाले, ‘‘सनातन संस्‍था आध्‍यात्मिक क्षेत्रात अद़्‍भुत कार्य करत आहे. सनातन संस्‍था आश्रमांची निर्मिती करून अध्‍यात्‍माचा प्रसार करत आहे. ‘तेलुगु सनातन पंचांग २०२३’च्‍या ‘अ‍ॅप’मध्‍ये आध्‍यात्‍मिक साधना, धर्मशिक्षण, धर्मरक्षण, आयुर्वेद, सण-उत्‍सव, आपत्‍काळ आदींविषयी माहिती देण्‍यात आली आहे. हे ‘अ‍ॅप’ अधिकाधिक हिंदूंनी डाऊनलोड करून धर्माचरण आणि साधना करून ईश्‍वरप्राप्‍तीच्‍या मार्गावर अग्रेसर व्‍हावे.’’