Bengaluru Blast ISIS Connection : बेंगळुरू येथेल रामेश्‍वरम् कॅफेमधील बाँबस्फोटातील आतंकवाद्यांचे इस्लामिक स्टेटशी संबंध !

२२ जानेवारी २०२४ या दिवशी अयोध्येतील श्रीराममंदिराच्या अभिषेकाच्या दिवशी बेंगळुरूतील भाजपच्या मुख्यालयात हा स्फोट घडवण्याची योजना होती. प्रचंड पोलीस बंदोबस्तामुळे आरोपींना ते शक्य झाले नाही.

नमाजपठणासाठी शुक्रवारी सुट्टी मिळत असेल, तर मंगळवारी हनुमान चालिसासाठी का मिळू नये ? – Assam CM

आज शुक्रवारी झारखंडमध्ये शाळा बंद होऊ लागल्या आहेत. जर तुम्ही शुक्रवारी शाळा बंद करू शकत असाल, तर मंगळवारी शाळा बंद ठेवण्याचे धाडस आमच्यात आहे.

निवडणूक विशेष

नागपूर येथे १ कोटी रुपये नेणारा धर्मांध कह्यात !…‘इलेक्ट्रॉनिक मीडिया मॉनिटरिंग सेंटर’ची स्थापना !…शिवडीत ११५ ज्येष्ठ नागरिकांचे गृह मतदान !…

हडपसर येथील ३ मजली इमारतीला भीषण आग !

आग पूर्णपणे आटोक्यात आली असून कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही आग नेमकी कशामुळे लागली ? हे अद्याप समजू शकलेले नाही.

हिंगोली येथील आमदार संतोष बांगर यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा नोंद !

मतदारांना पैसे वाटप करणे, तसेच सावरखेडा शिवारात अनुमती न घेता मंडप उभारणी करणे, अशी तक्रार त्यांच्याविरुद्ध प्राप्त झाली होती.

पुणे येथे गुटख्याची वाहतूक करणारा टेंपो पोलिसांनी पकडला !

गुटखा बंदी असतांना उत्पादने सिद्ध होणे ही कायदा सुव्यवस्थेची ऐशी-तैशीच !

सिल्लोड येथील जनतेला भयमुक्त केल्याविना स्वस्थ बसणार नाही ! – उद्धव ठाकरे

सिल्लोड येथे १५ नोव्हेंबर या दिवशी येथे घेतलेल्या सभेत ते बोलत होते.

शरद पवार हे केवळ तालुक्याचे नेते, ‘जाणता राजा’ ही नंतरची गोष्ट ! – मनसेप्रमुख राज ठाकरे

खडकवासला मतदारसंघात मनसेचे उमेदवार मयूरेश रमेश वांजळे यांच्या प्रचारार्थ मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा पार पडली, त्या वेळी ते बोलत होते.

गोव्यात सरकारी नोकरी घोटाळा प्रकरणाचे राज्यभर लोण !

सरकारी खात्यांमध्ये नोकर्‍या मिळवण्यासाठी पैशांची देवाणघेवाण झाल्याच्या तक्रारी गंभीर स्वरूपाच्या आहेत. या प्रकरणी सर्वसामान्यांना न्याय मिळणे आवश्यक आहे, तसेच सरकारी भरती प्रक्रियेतील पारदर्शकता टिकून राहावी, यासाठी नोकरी घोटाळा प्रकरणाचे सखोल अन्वेषण होणे आवश्यक आहे.

तलवारबाजीसाठी गोव्यातून सनातनचा बालसाधक कु. श्रीरंग दळवी याची निवड

१७ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर या कालावधीत होणार्‍या ६८ व्या राष्ट्रीय शालेय खेळ स्पर्धेसाठी गोव्यातून पर्वरी येथील एल्.डी. सामंत विद्यालयाचा विद्यार्थी, तसेच सनातनचा बालसाधक कु. श्रीरंग सुदेश दळवी (वय १३ वर्षे) याची निवड झाली आहे.