पुणे येथे गुटख्याची वाहतूक करणारा टेंपो पोलिसांनी पकडला !
गुटखा बंदी असतांना उत्पादने सिद्ध होणे ही कायदा सुव्यवस्थेची ऐशी-तैशीच !
गुटखा बंदी असतांना उत्पादने सिद्ध होणे ही कायदा सुव्यवस्थेची ऐशी-तैशीच !
सिल्लोड येथे १५ नोव्हेंबर या दिवशी येथे घेतलेल्या सभेत ते बोलत होते.
खडकवासला मतदारसंघात मनसेचे उमेदवार मयूरेश रमेश वांजळे यांच्या प्रचारार्थ मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा पार पडली, त्या वेळी ते बोलत होते.
सरकारी खात्यांमध्ये नोकर्या मिळवण्यासाठी पैशांची देवाणघेवाण झाल्याच्या तक्रारी गंभीर स्वरूपाच्या आहेत. या प्रकरणी सर्वसामान्यांना न्याय मिळणे आवश्यक आहे, तसेच सरकारी भरती प्रक्रियेतील पारदर्शकता टिकून राहावी, यासाठी नोकरी घोटाळा प्रकरणाचे सखोल अन्वेषण होणे आवश्यक आहे.
१७ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर या कालावधीत होणार्या ६८ व्या राष्ट्रीय शालेय खेळ स्पर्धेसाठी गोव्यातून पर्वरी येथील एल्.डी. सामंत विद्यालयाचा विद्यार्थी, तसेच सनातनचा बालसाधक कु. श्रीरंग सुदेश दळवी (वय १३ वर्षे) याची निवड झाली आहे.
जागतिक मधुमेहदिनाच्या निमित्ताने केळवकर मेडिकल सेंटर (ई वॉर्ड, ताराबाई पार्क) येथे १७ नोव्हेंबरला सकाळी ७.३० ते दुपारी १२.३० या वेळेत मधुमेहींसाठी विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
येथील वांद्रे-कुर्ला मेट्रो भूमीगत स्थानकात १५ नोव्हेंबर या दिवशी १ वाजता आग लागली. वांद्रे ते आरे वसाहत हा पहिला टप्पा नुकताच चालू करण्यात आला होता. भूमीगत मेट्रो स्थानकातील तळघरात ठेवलेले लाकडी साहित्य आणि फर्निचर यांना ही आग लागली.
कृषी क्षेत्राच्या उत्पादन वाढीच्या दरामध्ये फळपिकांचा प्रमुख सहभाग आहे. फळपिकांचे बाजारमूल्य अधिक असल्याने शेतकर्यांना चांगले उत्पन्न मिळते; मात्र फळपिकांचे अपेक्षित उत्पन्न न झाल्यास हानीही मोठी होते.
सुटी आणि निवडणूक कालावधी पूर्वनियोजित असतांनाही रक्त पिशव्यांची सोय न करणारे रक्तपेढीवाले असंवेदनशीलच होत !
बार्शी तालुक्यातील शेळगाव येथे कार्तिकी एकादशीची वारी पूर्ण करून गावात परतणार्या वारकर्यांच्या दिंडीत भरधाव वेगाने जाणारा टेंपो शिरल्याने झालेल्या अपघातात २ वारकर्यांचा मृत्यू झाला असून ६ वारकरी गंभीर घायाळ झाले आहेत.