निधर्मीवाद्यांच्या विरोधानंतर ‘एयरो इंडिया २०२३’मधील विमानावरील हनुमानाचे चित्र हटवले !

एखाद्या सरकारी आस्थापनावर हिंदूंच्या देवतांविषयी आदरयुक्त भाव ठेवून कृती केल्यावर ‘धर्मनिरपेक्षते’ची आठवण होणार्‍या निधर्मीवाद्यांना सरकारी भूमींवर अतिक्रमण होऊन मशिदी बांधल्यावर ‘धर्मनिरपेक्षता’ आठवत नाही का ?

हिंदुत्वनिष्ठ प्रवीण नेट्टारू हत्येतील आरोपी शाफी बेल्लारे याला जिहादी एस्.डी.पी.आय.कडून तिकीट !

यातून राज्यघटनेने दिलेल्या अधिकाराचा कशा प्रकारे दुरुपयोग करण्याचा प्रयत्न जिहादी संघटनेच्या राजकीय पक्षाकडून केला जात आहे. आता या पक्षावरही बंदी घालण्याची आवश्यकता आहे !

बेंगळुरू येथे ‘अल् कायदा’च्या आतंकवाद्याला अटक

एन्.आय.ए.ने सांगितले की, आरिफ हा कट्टरपंथी आहे, तथापि तो आतापर्यंत कोणत्याही घटनेत सहभागी नाही. तो लवकरच इराण आणि अफगाणिस्तान येथे जाण्याच्या सिद्धतेत होता.

उंटुरुकट्टे कैमर (कर्नाटक) येथील शासकीय शाळेतील ‘मुलांचा बाजार मेळाव्‍या’त सनातनच्‍या बालसाधिकेचा सहभाग

प्राथमिक शाळेत ‘मुलांचा बाजार मेळाव्‍या’चे आयोजन करण्‍यात आले होते. यात सनातन संस्‍थेचे साधक श्री. हरिश यांची कन्‍या कु. बिंबिता हिने सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्‍पादने यांचे प्रदर्शन लावले होते.

(म्हणे) ‘मी हिंदुविरोधी नाही, तर मनुवादविरोधी !’ – काँग्रेस नेते सिद्धरामय्या

सिद्धरामय्या यांनी कधी मनुस्मृतीचा अभ्यास केला आहे का ? अभ्यास केला असता, तर त्यांनी कधी असे विधान केले नसते ! केवळ दलितांची मते मिळवण्यासाठी हिंदूंच्या महान धर्मग्रंथांवर अशा प्रकारे विधान करणे हिंदुविरोधीच आहे, हे लक्षात घ्या !

न्यायालयाचा अवमान केल्याच्या प्रकरणी अधिवक्त्याला न्यायालयीन कोठडी !  

कर्नाटक उच्च न्यायालयाने अधिवक्ता के.एस्.अनिल यांना न्यायिक व्यवस्था आणि न्यायिक अधिकारी यांच्यावर बिनबुडाचे आरोप केल्याच्या प्रकरणी १ आठवड्याची न्यायालयीन कोठडी ठोठावली.

बेंगळुरूसहित जगातील अनेक शाळांमध्ये ‘चॅटजीपीटी’वर बंदी !

शहरातील आर्.व्ही. विश्‍वविद्यालयाने कृत्रिम बुद्धीमत्तेद्वारे (आर्टीफिशल इंटेलिजन्टद्वारे) चालवण्यात येणारी संभाषणात्मक संगणकीय प्रणाली ‘चॅटजीपीटी’वर बंदी घातली आहे, तर शहरातील अनेक महाविद्यालयांमध्ये यावर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे.

ब्राह्मणांनी मुख्यमंत्री होऊ नये का ? ते या देशाचे नागरिक नाहीत का ?

विश्‍वप्रसन्नतीर्थ स्वामीजी पुढे म्हणाले की, ब्राह्मणांच्या विरोधात बोलणे यात नवीन काहीच नाही. पूर्वीपासून ब्राह्मणांविरुद्ध बोलले जात असलेले ऐकिवात आहेच. निवडणूक आली की, याचे प्रमाण वाढते, एवढेच !

(म्हणे) ‘हिंदुत्वात हत्या, हिंसा आणि भेदभाव यांना दिला जातो पाठिंबा !’

हिंदुत्वात हत्या, हिंसा आणि भेदभाव असता, तर आज बहुसंख्य हिंदू ९ राज्यांत अल्पसंख्यांक झाले नसते ! काश्मीरमधून त्यांना पलायन करावे लागले नसते आणि सिद्धरामय्या यांनाही हे विधान करण्यापूर्वी विचार करावा लागला असता !