कर्नाटकातील भाजपच्या आमदाराच्या मुलाला ४० लाख रुपयांची लाच घेतांना अटक

प्रशांत यांच्या घरी ६ कोटी रुपये रोख मिळाले. प्रशांत हे बेंगळुरू पाणी पुरवठा आणि मलनिस्सारण मंडळाचे मुख्य लेखा अधिकारी आहेत.अशा लाचखोरांना कठोरातील कठोर शिक्षा झाली, तरच इतरांना त्याची वचक बसेल !

देशाचा स्‍वातंत्र्यलढा आणि उत्‍कर्ष यांत बेळगावचे योगदान अतुलनीय ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या हस्‍ते रिमोटद्वारे ‘किसान सन्‍मान योजने’अंतर्गत लाभार्थी शेतकर्‍यांना अनुदान वितरण करण्‍यात आले, तसेच नूतनीकरण करण्‍यात आलेल्‍या ‘बेळगाव हायटेक रेल्‍वे स्‍थानका’चे उद़्‍घाटन करण्‍यात आले. 

यादगिरी (कर्नाटक) येथील चौकाला टिपू सुलतानऐवजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्यावरून तणाव

कर्नाटकात भाजपचे सरकार असतांना टिपू सुलतनाचे नाव कसे काय दिले जात आहे ?, असा प्रश्न हिंदूंच्या मनात उपस्थित होणारच !

आय.ए.एस्. अधिकारी रोहिणी आणि आय.पी.एस्. अधिकारी रूपा यांचे अखेर स्थानांतर !

आय.ए.एस्. अधिकारी रोहिणी सिंधुरी म्हणाल्या की, शिष्टाचारानुसार सरकारी अधिकार्‍यांनी प्रसारमाध्यमांसमोर जाऊ नये.

बसवाहकाने एक रुपया परत दिला नाही; म्हणून प्रवाशाला ३ सहस्र रुपये हानीभरपाई !

बेंगळुरू येथे बसवाहकाने प्रवाशाला तिकिटाचा एक रुपया परत न दिल्याने प्रवाशाने ग्राहक न्यायालयाकडे तक्रार केली. याच्या परिणामस्वरूप न्यायालयाने ग्राहकाला ३ सहस्र रुपयांची हानीभरपाई देण्याचा आदेश दिला.

आयफोनसाठी तरुणाने ऑनलाईन मागवलेले साहित्य पोचवणार्‍या तरुणाची केली हत्या !

तरुण पिढीवर योग्य संस्कार होत नसल्याचाच हा परिणाम आहे ! याला सर्वपक्षीय शासनकर्ते, पालक आणि समाज उत्तरदायी आहेत !

‘हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड’च्या लढाऊ विमानावर पुन्हा लावण्यात आले श्री हनुमंताचे चित्र !

बेंगळुरू येथे आयोजित करण्यात आलेल्या आशियातील सर्वांत मोठ्या ‘हवाई कवायतीं’च्या कार्यक्रमात ‘हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड’च्या अर्थात् ‘हॉल’च्या लढाऊ विमानावर पुन्हा श्री हनुमंताचे चित्र लावल्याचे दिसून आले.

भाजप सरकारकडून मंदिर आणि मठ यांच्या विकासासाठी १ सहस्र कोटी रुपयांची तरतूद

कर्नाटकातील भाजप सरकारने राज्याचा वर्ष २०२३-२४ चा अर्थसंकल्प सादर केला आहे. यात राज्यातील रामनगर येथे भव्य श्रीराममंदिर बांधण्यात येणार असल्याचेही घोषित केले आहे !

निधर्मीवाद्यांच्या विरोधानंतर ‘एयरो इंडिया २०२३’मधील विमानावरील हनुमानाचे चित्र हटवले !

एखाद्या सरकारी आस्थापनावर हिंदूंच्या देवतांविषयी आदरयुक्त भाव ठेवून कृती केल्यावर ‘धर्मनिरपेक्षते’ची आठवण होणार्‍या निधर्मीवाद्यांना सरकारी भूमींवर अतिक्रमण होऊन मशिदी बांधल्यावर ‘धर्मनिरपेक्षता’ आठवत नाही का ?