कर्नाटकच्या विधान परिषदेचे माजी आमदार इव्हान डिसोझा यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकमधील काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची राज्याच्या विधान परिषदेचे माजी आमदार इव्हान डिसोझा यांनी भेट घेऊन ‘पुढील अर्थसंकल्पात ख्रिस्ती समुदायाच्या विकासासाठी न्यूनतम ५०० कोटी रुपयांची तरतूद करावी, अशी मागणी केली. यावर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ‘अधिक अनुदान देऊन तुमच्या मागणीविषयी सकारात्मक स्वीकार करीन’, असे आश्वासन दिले. या वेळी डिसोझा यांच्या समवेत कारकळ अत्तुरू बसिलिक चर्चचे अल्बन डिसोझा आणि संतोष डिसिल्वा हे उपस्थित होते.
‘कर्नाटक ख्रिश्चन विकास मंडळ’ स्थापन केल्यासाठी इव्हान डिसोझा यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे अभिनंदन केले. (कर्नाटकच्या काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी कधी हिंदूंसाठी विकास मंडळ स्थापन केले आहे का ? काँग्रेसला मत देऊन तिला सत्तेवर बसवणार्या हिंदूंना हे मान्य आहे का ? – संपादक)
संपादकीय भूमिकाहिंदू कधी काँग्रेस किंवा अन्य पक्षांच्या सरकारांकडे ‘हिंदूंच्या विकासासाठी अमूक रक्कम द्या’, अशी मागणी करतात का ? ‘जर धर्मनिरपेक्ष देशातील बहुसंख्य असणारे हिंदू अशी मागणी करत नाहीत, तर अल्पसंख्यांक अशी मागणी का करतात ? ते धर्माच्या नावाखाली सुखसुविधा कशा मागतात ?’, असे प्रश्न हिंदूंनी विचारणे आवश्यक आहे ! |