राम-कृष्णाची सेवा, हीच देशसेवा आहे ! – पेजावर मठाचे विश्‍वप्रसन्न तीर्थ श्रीपाद

पेजावर मठाचे विश्‍वप्रसन्न तीर्थ श्रीपाद

उडुपी (कर्नाटक) – देशातील काही दुराचारी म्हणतात की, ‘मोदी, योगी गेले की, राममंदिर उखडून टाकू.’ पुष्कळ मोठा लढा दिल्यावर, श्रमाचे फळ म्हणून निर्माण झालेले श्रीराममंदिर अमर झाले पाहिजे. अयोध्येत श्रीराममंदिराची निर्मिती झाली. आता न्यायालयाने मथुरेतील श्रीकृष्णमंदिराच्या सर्वेक्षणाला अनुमती दिली आहे. आता तेथे श्रीकृष्णाचे मंदिर उभारून देश उभारूया. राम-कृष्णाची सेवा हीच देशसेवा आहे, असे मार्गदशनपर उद्गार पेजावर मठाचे विश्‍वप्रसन्न तीर्थ श्रीपाद यांनी काढले. ते येथे एका कार्यक्रमात बोलत होते.

ते पुढे म्हणाले, ‘‘अयोध्येत श्रीराममंदिर निर्माण केले म्हणजे आपले काम संपले, असे समजू नका. आता आपल्यावर नवे दायित्व आले आहे. पुढील अनेक शतके श्रीराममंदिर टिकवायचे असेल, तर देशातील हिंदूंनी ‘हिंदु’ म्हणूनच राहिले पाहिजे. त्यासाठी सर्व हिंदूंनी आपल्या मुलांचे पुन्हा नामकरण केले पाहिजे. देवाचे नाव आठवेल अथवा अर्थपूर्ण असे मुलांचे पुन्हा ठेवावे.