मधुबनी (बिहार) येथील मंदिरांतील दोघा साधूंची शिरच्छेद करून हत्या !

बिहारमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचे द्योतक. भारतभर साधू-संतांच्या हत्या होत असतांना त्यांच्या रक्षणासाठी केंद्र सरकारने पावले उचलणे आवश्यक !

लालूप्रसाद यादव यांना दुकमा कोषागार प्रकरणात झारखंड उच्च न्यायालयाकडून जामीन संमत

लालूप्रसाद यादव सध्या चारा घोटाळ्याच्या प्रकरणी ७ वर्षांच्या कारावासाची शिक्षा भोगत आहेत.

पाटलीपुत्र (बिहार) शहरातील मोठ्या रुग्णालयामध्ये ऑक्सिजनच्या जागी रुग्णांच्या शरिरात चढवले जात आहे बिसलेरीचे पाणी !

शहरातील दुसरे मोठे रुग्णालय असलेल्या एन्.एम्.सी.एच्.मध्ये अनेक कोरोना रुग्णांचे मृत्यू होत आहेत. रुग्णालयाच्या बाहेर रुग्णवाहिकांची रांग लागली आहे.

पॉस्को न्यायालयाने आरोपीला बलात्कारी ठरवल्याचा निकाल पाटणा उच्च न्यायालयाकडून रहित

पाटणा उच्च न्यायालयाने एका प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने दिलेला निकाल पालटत ‘न्यायाधिशांना प्रशिक्षणाची आवश्यकता आहे’ असे म्हटले आहे. ‘पॉस्को’ न्यायालयाने बलात्काराचा प्रयत्न करणार्‍याला १० वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावली होती.

मशिदीवरील भोंग्यांद्वारे धर्मांधांच्या जमावाला उद्घोषणा करून बोलावल्याचे उघड !

मशिदींवरील भोंग्यांचा धर्मांधांकडून कसा वापर केला जात आहे, हे पहाता आतातरी सर्वपक्षीय शासनकर्ते भोंग्यांवर बंदी घालतील का ? भोंगे सर्वसामान्यांना त्रास देतात, तर पोलिसांचा बळी घेतात. तरीही सरकार त्यांवर बंदी का घालत नाही ?

लालूप्रसाद यादव यांची प्रकृती बरी होण्यासाठी त्यांची मुलगी रमझानच्या काळात रोजे (उपवास) ठेवणार !

हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने ते अन्य धर्मियांच्या धार्मिक कृती करून स्वतःला ‘धर्मनिरपेक्ष’ असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करतात; मात्र अन्य धर्मीय कधीही हिंदूंच्या धार्मिक कृतींचे पालन करून ते ‘धर्मनिरपेक्ष’ असल्याचे कधीही दाखवत नाहीत.

बिहारमध्ये कोरोनाबाधित जिवंत व्यक्तीला मृत घोषित करून दुसर्‍याचाच मृतदेह कुटुंबियांकडे सुपुर्द !

कोरोनाच्या काळात अशा प्रकारच्या अनेक घटना देशभरात घडल्या आहेत आणि घडत आहेत. यातून रुग्णालय व्यवस्थापनाचा भोंगळ कारभार दिसून येतो. अशा गंभीर चुका टाळण्यासाठी संबंधितांवर कठोर कारवाई केली पाहिजे !

सासाराम (बिहार) येथे कोरोनामुळे कोचिंग सेटर बंद केल्याने विद्यार्थ्यांकडून तोडफोड आणि जाळपोळ

नियमांचे पालन करण्याऐवजी त्यांचा अशा प्रकारे विरोध करणार्‍या विद्यार्थ्यांवर काय संस्कार झाले आहेत, हे लक्षात येते ! असे विद्यार्थी कधीतरी देशाचे आदर्श नागरिक होऊ शकतील का ?

सरकारी कर्मचारी ऐकत नसतील, तर त्यांना बांबूचे फटके मारा ! – केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांचा जनतेला सल्ला

हे म्हणजे कायदा हातात घेण्याचा प्रकार ! प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी यांना वठणीवर आणण्याचे दायित्व सरकारचे नाही का ? असे सल्ले देण्याऐवजी केंद्रीय मंत्र्यांनी प्रशासन लोकाभिमुख कसे होईल, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक !

गोपालगंज (बिहार) येथील विषारी दारूच्या प्रकरणी ९ जणांना फाशी, तर ४ महिलांना जन्मठेपेची शिक्षा

खजूरबानी येथे वर्ष २०१६ मध्ये विषारी दारू प्यायल्याने १९ जणांचा मृत्यू, तर ६ जण आंधळे झाल्याच्या प्रकरणी गोपालगंजमधील न्यायालयाने ९ आरोपींना फाशीची आणि ४ महिलांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.