लव्ह जिहादला विरोध करणार्या महंतांच्या आश्रमावरही आक्रमण
बिहारमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचे द्योतक. भारतभर साधू-संतांच्या हत्या होत असतांना त्यांच्या रक्षणासाठी केंद्र सरकारने पावले उचलणे आवश्यक !

मधुबनी (बिहार) – येथील खिरहर गावामध्ये दोघा साधूंची कुदळीने शिरच्छेद करून हत्या करण्यात आली. हे दोन्ही साधू येथील धरोहर नाथ मंदिरात अनेक वर्षांपासून रहात होते. रात्री झोपेत असतांना त्यांची हत्या करण्यात आली. या हत्येमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस या घटनेचे अन्वेषण करत आहेत. घटना उघडकीस आल्यावर येथे मोठ्या संख्येने गावकरी गोळा झाले होते. हत्येमध्ये ४-५ जणांचा समावेश असल्याचा दावा ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे. हत्या केल्यानंतर या साधूंचे धड लाकडाच्या भूशात लपवण्यात आले होते, तर त्यांचे शीर अन्यत्र ठेवण्यात आले होते.
मधुबनी में अपराधियों ने पुजारी समेत दो लोगों की हत्या कर दी। घटना खिरहर थानाक्षेत्र के धरोहरनाथ मंदिर की है। डबल मर्डर से इलाके में दहशत फैल गई है। pic.twitter.com/qsVpxe9GqN
— News18 Bihar (@News18Bihar) April 21, 2021
बिसौली कुटी आश्रमावरही आक्रमण

या घटनेच्या आदल्या रात्री येथून जवळच असलेल्या बिसौली कुटीचे महंत ब्रजमोहन दास यांच्या आश्रमावरही आक्रमण करण्यात आले होते. महंत ब्रजमोहन दास या भागातील लव्ह जिहाद आणि धर्मांधांच्या विरोधात सक्रीय आहेत. त्यामुळे त्यांच्यावर धर्मांधांकडून आक्रमण झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
ठाणे जिल्ह्यात विविध ठिकाणी घरफोड्या करणारे धर्मांध अटकेत
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
सिंहगडावर लावले ‘हा किल्ला हिंदूंचा, इथे मुसलमानांना प्रवेश नाही’ असे फलक !
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती