दंगल पीडित मुसलमानांना साहाय्य; मात्र पीडित हिंदूंना साहाय्य करण्यास टाळाटाळ

देहली दंगलीचे एक वर्ष !

  • आम आदमी पक्षाचे सरकार आणि शिखांची ‘खालसा’ संघटना यांचा हिंदुद्वेष !
  • निधर्मीवादी आम आदमी पक्षाच्या सरकारचा हिंदुद्वेष ! असे सरकार राज्यघटनेचे आणि मानवाधिकाराचेही उल्लंघन करत आहे ! याविषयी आता कुणी का बोलत नाही ?
  • धर्मांध मोगलांच्या विरोधात लढतांना शिखांच्या गुरूंनी हौतात्म्य पत्करले. निवळ हिंदुद्वेषापायी त्याच धर्मांधांच्या वंशजांना अशा प्रकारे पोसणे हा आत्मघात होय. ‘खालसा’वाल्यांना हे समजेल, तो सुदिन !

नवी देहली – देहलीमध्ये झालेल्या दंगलीला एक वर्ष पूर्ण झाले आहे. धर्मांधांनी चालू केलेली दंगल ही ३ दिवस चालू होती. यात हिंदु आणि मुसलमान या दोघांची हानी झाली. यात ५० हून अधिक जण ठार झाले. याविषयी काही वृत्तपत्रांनी पीडितांशी संपर्क साधला असता राज्यातील आम आदमी पक्षाचे सरकार आणि ‘खालसा’ या संघटनेने मुसलमान पीडितांना पुरेपूर साहाय्य केले, तर पीडित हिंदूंना साहाय्य देण्यास टाळाटाळ केल्याचे दिसून आले.

१. एका पीडित हिंदूने सांगितले की, दंगलीच्या काही मासांनंतर खालसा संघटनेचे लोक साहाय्यता देत होते. त्यांनी पीडित मुसलमानांना साहाय्य केले, तर हिंदूंकडे दुर्लक्ष केले. त्यांनी १०० पैकी ९० टक्के मुसलमानांना साहाय्य केले.

२. राज्यातील केजरीवाल सरकारने मशिदीमध्ये अन्नधान्य आणि फळे पाठवली; मात्र हिंदूंना काहीही दिले नाही. मशिदींना पाठवलेल्या साहित्यांचे वाटप मुसलमानांमध्ये करण्यात आले होते.

३. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, अद्यापही येथे तणावाची स्थिती आहे. त्यामुळे हिंदूंमध्ये भीतीचे वातावरण आहे. काही दिवसांपूर्वी येथील मुसलमानबहुल मुस्तफाबादमध्ये धर्मांधांच्या जमावाने दुचाकीवरून जाणार्‍या एका हिंदु तरुणाला मारहाण केली. यामुळे येथे तणाव निर्माण झाला. हे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले नाही. आज येथील अनेक हिंदूंनी घर सोडून पलायन केले आहे.