स्त्रियांच्या ‘श्वेत प्रदर’ या विकारात उपयुक्त ‘सनातन लघुमालिनी वसंत (गोळ्या)’

श्वेत प्रदरामध्ये ‘सनातन लघुमालिनी वसंत’ या औषधाच्या १ – २ गोळ्यांची पूड करून पाव चमचा मधात मिसळून सकाळ – सायंकाळ चाटून खावी. १ मास हे उपचार करून पहावेत. गुण न आल्यास स्थानिक वैद्यांना भेटून उपचार घ्यावेत.’ 

संकटग्रस्त महिलांच्या साहाय्यासाठीचा ‘१८१’ हेल्पलाईन क्रमांक स्वतंत्रपणे कार्यरत होणार !

संकटग्रस्त, पीडित महिलांना तातडीने साहाय्य देण्यासाठी कार्यरत असलेला ‘१८१’ ‘टोल फ्री’ क्रमांक आतापर्यंत मुख्यमंत्री हेल्पलाईन क्रमांकामध्ये विलीन होता.

सहकारी महिला कर्मचार्‍यांकडे टक लावून पाहिल्‍यास निलंबन होणार !

महिला तक्रार निवारण समिती राज्‍यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांत स्‍थापन केली पाहिजे !

महाराष्ट्रातील महिलांना न्याय देणारे सरकार ! – सौ. चित्रा वाघ, महिला प्रदेश मोर्चा प्रदेशाध्यक्ष, भाजप

मुंबई महानगरात गोवरविषयी जागृती प्रसारात आरोग्य सर्वेक्षणाच्या त्रुटी आढळून आल्या होत्या. या त्रुटी दूर करण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने ५ सहस्र ५०० आशा सेविकांना सेवेत सामावून घेण्याचा निर्णय घेतला आहे.

मी असे शिक्षण स्वीकारू शकत नाही, जिथे माझी आई आणि मुलगी शिकू शकत नाही !

भारतातील महाविद्यालयांत मुसलमान विद्यार्थिनींनी हिजाब घालण्याचे समर्थन करत अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा उदोउदो करणारे कथित धर्मनिरपेक्षतावादी अफगाणिस्तानातील तालिबानच्या महिलाविरोधी जाचक नियमांवर मात्र चकार शब्दही काढत नाहीत !

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या सुषमा अंधारे यांच्यावर गुन्हा नोंद करून कारवाई करा !

संबंधित महिलेची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा आणि योग्य ती कारवाई करावी, अन्यथा आम्हाला महाराष्ट्रभर वैध मार्गाने आंदोलन करावे लागेल.

यापुढे महिला आरक्षित जागेवर महिलांचीच नियुक्ती होईल ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

आमदार डॉ. भारती लव्हेकर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर फडणवीस यांनी वरील आश्वासन दिले. येत्या ३ मासांत याविषयीचा आदेश निर्गमित करण्यात येईल.

सानिया बनणार देशाच्या पहिल्या मुसलमान महिला लढाऊ वैमानिक !

येथील सानिया या देशाच्या पहिल्या मुसलमान महिला लढाऊ (फायटर) वैमानिक बनणार आहेत. त्यांनी ‘राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी’ची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. २७ डिसेंबर २०२२ या दिवशी त्या लढाऊ वैमानिक म्हणून पहिले उड्डाण करतील.

नागपूर येथील विधीमंडळ इमारतीत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हिरकणी कक्षाचे उद्घाटन !

अधिवेशनाच्या काळात आमदार सौ. सरोज अहिरे यांना त्यांच्या बाळाची काळजी घेता यावी, यासाठी नागपूर येथील विधीमंडळाच्या विस्तारीत इमारतीतील दालन क्रमांक १०६ मध्ये हिरकणी कक्ष चालू करण्यात आला आहे.

मुंबईमध्ये ५ सहस्र ५०० आशासेविका करणार आरोग्यसेवांचे सर्वेक्षण ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

‘‘यापूर्वीच्या सरकारने आरोग्यसेवेकडे दुर्लक्ष केल्यामुळे मुंबईतील रुग्णालयांची अशी स्थिती झाली आहे. आता मात्र हा प्रश्नाकडे आम्ही गांभीर्याने लक्ष देऊ.