सनातनची आयुर्वेदाची औषधे
‘योनीमार्गातून पांढरा स्राव होणे’, या विकाराला ‘श्वेत प्रदर’ किंवा ‘पांढरी धुपणी’ असे म्हणतात. आयुर्वेदानुसार ‘योनीमार्गातील लहान लहान ग्रंथींच्या स्रावाच्या ठिकाणी जंतूसंसर्ग होणे, तसेच वारंवार अपचन होणे, या कारणांमुळे हा विकार होतो. यांपैकी ‘अपचन’ हे कारण असल्यास ‘लघुमालिनी वसंत’ हे औषध पुष्कळ चांगले कार्य करते. या प्रकारच्या प्रदरामध्ये अगदी पाण्यासारखा स्राव होतो. डोके भ्रमल्यासारखे वाटते आणि वारंवार दुखते. घशात कोरड किंवा चिकटा वाटतो. वारंवार दीर्घ श्वास घ्यावासा वाटतो. पोटात वायू धरल्यासारखे वाटते. शौचाला कधी साफ, तर कधी अधिक वेळा होते. पांढरट आणि आंबूस वासाचे शौचाला होणे आणि त्यानंतर प्रदर अधिक वाढणे, ही लक्षणे असतांना ‘लघुमालिनी वसंत’ हे औषध द्यावे.’ (साभार : औषधी गुणधर्मशास्त्र, लेखक : वैद्यपंचानन गंगाधरशास्त्री गुणे)
श्वेत प्रदरामध्ये ‘सनातन लघुमालिनी वसंत’ या औषधाच्या १ – २ गोळ्यांची पूड करून पाव चमचा मधात मिसळून सकाळ – सायंकाळ चाटून खावी. १ मास हे उपचार करून पहावेत. गुण न आल्यास स्थानिक वैद्यांना भेटून उपचार घ्यावेत.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, रामनाथी, गोवा. (२४.१२.२०२२)