समाजकल्‍याण विभागात स्‍थानांतरासाठी पैशांच्‍या मागणीचा आरोप !

समाजकल्‍याण विभागात स्‍थानांतरासाठी प्रत्‍येकाकडून ४० लाख रुपये घेतले जातात. समाजकल्‍याण विभागाच्‍या एका महिला उपायुक्‍तांचे याविषयीचे १५ मिनिटांचे ध्‍वनीमुद्रण उपलब्‍ध असून त्‍यामध्‍ये मुख्‍यमंत्र्यांचेही नाव आहे.

सेल्‍फी काढतांना नदीत पडून वाहून जाणार्‍या महिलेला वाचवले !

सेल्‍फी काढतांना एक महिला पाय घसरून नदीत पडली. ती वाहून जात होती; पण तेथे असलेल्‍या डहाणू पंचायत समितीच्‍या उपसभापतीने वेळीच नदीत उडी मारून महिलेचा जीव वाचवला.

मिरज येथे ‘श्रीविष्‍णुसहस्रनाम पठण’ कार्यक्रमात सनातनच्‍या सात्त्विक अत्तराचे वाटप !

अधिक मास अर्थात् पुरुषोत्तम मासानिमित्त ‘ब्राह्मण महिला संघ मिरज’च्‍या वतीने राघवेंद्रस्‍वामी मठात सामूहिक ‘श्रीविष्‍णुसहस्रनाम पठण’ कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. यासाठी १०० महिला उपस्‍थित होत्‍या. या सर्व महिलांना ब्राह्मण महिला संघाच्‍या वतीने १५० सनातनच्‍या सात्त्विक अत्तराच्‍या बाटल्‍या देण्‍यात आल्‍या.

महिलांच्‍या विरोधातील गुन्‍ह्यांवर सहनशीलता बाळगणार नाही ! – केंद्रशासनाचे सर्वोच्‍च न्‍यायालयात प्रतिज्ञापत्र मणीपूरचे प्रकरण केंद्रीय अन्‍वेषण विभागाकडे सोपवले !

लव्‍ह जिहादमध्‍ये अडकलेल्‍या सहस्रावधी हिंदु मुलींसंदर्भातही सरकारी यंत्रणांकडून अशी भूमिका कधी घेतली जाणार ?

मणीपूरमध्ये हिंसाचार चालूच : महिलांच्या जमावाने घरे, शाळा पेटवल्या

या वेळी गोळीबार आणि बाँबस्फोटही झाले. या जमावाने सीमा सुरक्षादलाची वाहने हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. या जमावाने किमान १० घरे जाळली आहेत.

पुणे येथे चित्रपटगृहात महिलेशी अश्‍लील वर्तन करणार्‍या २ धर्मांधांसह एकाला अटक !

‘मगरपट्टा सिटी’तील चित्रपटगृहात महिलेशी अश्‍लील वर्तन करणार्‍या तिघांना हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. महिलेच्‍या पतीने तिघांना खडसावले. तेव्‍हा आरोपींनी पतीला शिवीगाळ करून धमकावले. या प्रकरणी महिलेच्‍या पतीने पोलिसांकडे तक्रार दिली असून पसार झालेले महंमद आदिल, अफजल अली आणि अन्‍य एकाला अटक करण्‍यात आली आहे.

मीरा रोड (ठाणे) येथे धर्मांधांकडून हिंदु मुलीला धमकावून धर्मांतर आणि निकाह

धर्मांधांच्‍या मनात आलेली मुलगी त्‍यांना हवीच, ही मानसिकता हिंदूंसाठी घातक असल्‍याने धर्मांधांना कठोर शिक्षा होणे आवश्‍यक !

डब्ल्यू-२० परिषदेमध्ये बचत गटांच्या महिलांनी व्यावसायिक अडचणींविषयी मनोगत केले व्यक्त !

महिला बचत गट म्हणजे पापड-लोणची आणि खाद्यपदार्थ करणार्‍या महिलांचे संघ असा काहीसा समज असतो. त्याला छेद देणारे कार्य महिला करत असल्याचे या परिषदेत स्पष्ट झाले.

भारतरत्न महर्षी कर्वेंचे महिला सक्षमीकरणाचे कार्य आजही अविरत चालू ! – डॉ. नितीन प्रभूतेंडोलकर

महिला ही एक शक्ती आहे. महिलांची निर्णय घेण्याची क्षमता विकसित करणे महत्त्वाचे आहे. केवळ ऐकून नव्हे, तर कृतीत आणणे आवश्यक आहे. त्याकरता डब्ल्यू-२० चे आयोजन केले आहे.