मीरा रोड (ठाणे) येथे धर्मांधांकडून हिंदु मुलीला धमकावून धर्मांतर आणि निकाह

प्रतिकात्मक चित्र

ठाणे – मीरा रोड येथे २२ वर्षीय हिंदु तरुणीला धमकावून तिला प्रेमाची कबुली देण्‍यास भाग पाडले, पुढे तिच्‍यावर अत्‍याचार करून, तसेच फसवून निकाह केला. तिचे धर्मांतर केले आणि तिला दुबईला पाठवण्‍याचा कट रचला. या हिंदु पीडितेने कशीबशी यातून तिची सुटका करून घेऊन तक्रार केल्‍यावर ४ जणांना अटक करण्‍यात आली आहे.

  • जिवे मारण्‍याची आणि व्‍हिडिओ प्रदर्शित करायची धमकी
  • दुबईला पाठवण्‍याचा डाव
  • गोमांस खाण्‍यास सांगितले
  • शारीरिक आणि मानसिक छळ

१. ईराम नावाच्‍या मैत्रिणीने तिची ओळख संगणक शिकवणीवर्गात शिकवणार्‍या शहाबाजशी करून दिली. त्‍याने अमिन शेख याच्‍याशी ओळख करून दिल्‍यावर एक दिवस अचानक त्‍याने रस्‍त्‍यात चाकूचा धाक दाखवून तिला प्रेमाची मान्‍यता देण्‍यास भाग पाडले; अन्‍यथा आत्‍महत्‍या करण्‍याची धमकी दिली.

२. खोटी कारणे देऊन अमिनने तिला घरी बोलावून तिच्‍यावर अत्‍याचार केले. तिचे अश्‍लील व्‍हिडिओ प्रदर्शित करण्‍याच्‍या धमक्‍या वारंवार देत होता. नंतर बळजोरीने घरी निकाह करत असल्‍याचा संदेश पाठवायला सांगितला. अन्‍य २ धर्मांध मुलांसमवेत तिला चारचाकीत बसवून काझीकडे नेऊन बळजोरीने निकाह करून तिचे धर्मांतर केले. उत्तनच्‍या हजरत बालेशाह सय्‍यद दर्ग्‍यात नेऊन तिच्‍या हातावर तावीज बांधला.

३. घरी गेल्‍यावर अमिन पूर्वीच विवाहित असल्‍याचे तिला लक्षात आले. वारंवार तो तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करत राहिला. पीडिता एकदा आजारी पडल्‍यावर घरी एका मौलानाला बोलावून तिला गायीच्‍या मटणाची बिर्याणी खाल्‍ल्‍यावर आजार बरा होईल, असे सांगण्‍यात आले.

४. अमिनच्‍या आईने अचानक तिला ‘दुबईला जायचे आहे’, असे सांगून नमाज पढणे, रोजा ठेवणे भाग पाडले.

५. पीडितेला घरात कोंडून एकदा अमिन बाहेर गेला असता तिने आरडाओरडा करून शेजार्‍यांना बोलावले तेव्‍हा शेजार्‍यांनी कुलूप तोडून तिची सुटका केली.

६. नयानगर पोलिसांनी भादवि कलम ३७६ (२) (एन्), ३६६, ३२३, ५०४, ४०६ आणि ३४ अन्‍वये गुन्‍हा नोंद केला आहे.

संपादकीय भूमिका :

  • धर्मांधांच्‍या मनात आलेली मुलगी त्‍यांना हवीच, ही मानसिकता हिंदूंसाठी घातक असल्‍याने धर्मांधांना कठोर शिक्षा होणे आवश्‍यक !
  • अंगावर शहारे आणणारी ही लव्‍ह जिहादची कथा असूनही याचे वृत्त देतांना अद्यापही प्रसारमाध्‍यमे ‘कथित’ शब्‍द वापरत आहेत. लव्‍ह जिहादसाठी त्‍यांना अजून काय पुरावे हवे आहेत ?