मणीपूरमध्ये हिंसाचार चालूच : महिलांच्या जमावाने घरे, शाळा पेटवल्या

मणीपूरमध्ये हिंसाचार चालूच

इंफाळ – मणीपूरमध्ये हिंसाचार चालूच असून ताज्या घटनेनुसार चुरचंदपूर जिल्ह्यातील तोरबांग येथे महिलांच्या एका जमावाने घरे आणि शाळा यांना आग लावली. या वेळी गोळीबार आणि बाँबस्फोटही झाले. या जमावाने सीमा सुरक्षादलाची वाहने हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. या जमावाने किमान १० घरे जाळली आहेत.

(सौजन्य : The Economic Times)

संघाच्या नेत्याकडून तक्रार

मणीपूरमध्ये २ महिलांना विवस्त्र करून फिरवल्याच्या प्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी आणि त्यांचा मुलगा यांचा हात असल्याचा आरोप करणारे विधान सामाजिक प्रसारमाध्यमांवर प्रसारित करण्यात आले आहे. यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पीडित पदाधिकार्‍याने पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून अन्वेषण चालू केले आहे.