Karnataka Headmistress Offensive Photographs : कर्नाटकात इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यासमवेत आक्षेपार्ह छायाचित्रे काढल्यावरून मुख्याध्यापिका निलंबित !  

अशा मुख्याध्यापिका विद्यार्थ्यांवर कसले संस्कार करणार ?

Hindu Woman Pakistan Election : पाकिस्तानच्या संसदेच्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच हिंदु महिला निवडणूक लढणार !

त्या गरीब आणि वंचित लोकांसाठी काम करतील. ‘सरकारी रुग्णालयातील दुरवस्था पाहून त्यात सुधारणा करण्यासाठी त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला !’

ठाणे येथे वेश्या व्यवसाय करणार्‍या दलाल महिलेला अटक

ठाणे येथील तीन पेट्रोल पंप या जुन्या आणि उच्चभ्रू लोकवस्तीमध्ये ‘फॅमिली सलोन आणि स्पा’ यांच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालू असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

गरोदर महिलेचा मृत्यू आणि असंवेदनशील आरोग्य विभाग !

आमदारांनी उपस्थित केलेले सर्वच प्रश्न गंभीर असून आरोग्य विभागाची दु:स्थिती दाखवणारे आहेत. यामुळे ‘आरोग्य यंत्रणा रुग्णांना जगवण्यासाठी कि मारण्यासाठी ?’, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सरकारने या प्रकरणात गंभीर लक्ष देणे आवश्यक आहे.

शाळेतील ‘सखी सावित्री समिती’मध्ये महिला आमदारांना सामावून घेऊ ! – दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री 

शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि पालकांचे समुपदेशन करण्यासाठी स्थापन केलेल्या ‘सखी सावित्री समिती’च्या कार्यामध्ये महिला आमदार यांना सामावून घ्यावे अशी सूचना उपसभापती नीलम गोर्‍हे यांनी केली होती.

गोवा : सरकारी नोकरी देण्याचे आमीष दाखवून महिलेची फसवणूक

गोव्यात सरकारी नोकरी दलालांमार्फत मिळते का ? जनताही अशा प्रकारे आडमार्गाने नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न का करते ? या घटनेत महिलेचे अज्ञान आहे कि लाच देऊन दलालांमार्फत नोकरी मिळवण्याचा प्रयत्न आहे ?

स्नानगृहातील तरुणीचे चित्रीकरण करणार्‍या कर्मचार्‍याला अटक !

अशा वासनांधांवर रुग्णालय प्रशासन कठोर कारवाई करेल का ?

गोंदवले बुद्रुक (जिल्हा सातारा) गावात मद्यबंदीचा ठराव संमत !

गोंदवले बुद्रुक हे गाव ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्यामुळे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र बनले आहे. अशा ठिकाणी गावात भटकणारे मद्यपी आढळून येतात. ही गोष्ट अशोभनीय असून याचा त्रास महिला आणि भाविक यांना होत असतो.

Goa Fake Beneficiaries Griha Aadhaar Yojana : एक वर्ष उलटूनही गृहआधार योजनेच्या बनावट लाभार्थींकडून कोट्यवधी रुपयांची वसुली झाली नाही !

पती सरकारी कर्मचारी असतांनाही ३ सहस्रांहून अधिक महिलांनी अनधिकृतपणे या योजनेचा लाभ घेतला !

संपादकीय : फालतू फेमिनिझम् !

नीना गुप्ता यांनी ‘फेमिनिझम्’ला फालतू म्हटले, तर त्यामुळे स्त्रीमुक्तीवाल्यांना मिर्च्या झोंबण्याचे काही कारण नाही. स्त्रीला कशापासून मुक्तता मिळवून द्यायची आहे ? ‘स्त्रियांचे हित आणि त्यांचा उत्कर्ष कशात आहे ? आणि हा उत्कर्ष अशा चळवळींमुळे साध्य होणार का ?’, याचा विचार करण्याची वेळी आली आहे.