ठाणे – येथील तीन पेट्रोल पंप या जुन्या आणि उच्चभ्रू लोकवस्तीमध्ये ‘फॅमिली सलोन आणि स्पा’ यांच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालू असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी नौपाडा पोलिसांनी दोन तरुणींची वेश्या व्यवसायातून सुटका केली आहे, तर एका दलाल महिलेला अटक केली आहे.