मुंबई येथे हिंदु जनजागृती समिती आयोजित प्रांतीय हिंदु अधिवेशनाला प्रारंभ !

संतांच्या वंदनीय उपस्थितीत आणि धर्मप्रेमींच्या उत्साहपूर्ण सहभागाने ‘जयतु जयतु हिंदुराष्ट्रम्’, ‘हर हर महादेव’ आदी स्फूर्तीदायक जयघोषात मुंबई येथे प्रांतीय हिंदु अधिवेशनाला १२ मार्च या दिवशी प्रारंभ झाला.

नगर येथे वाईन विक्रीच्या विरोधात राष्ट्रीय वारकरी परिषदेच्या वतीने निवेदन !

राज्य सरकारने मॉल आणि किराणा दुकानांमध्ये वाईन विक्री च्या संदर्भात घेतलेला निर्णय त्वरित मागे घ्यावा, यासाठीचे निवेदन ‘राष्ट्रीय वारकरी परिषद महाराष्ट्र राज्य’च्या वतीने राहुरी तालुका नायब तहसीलदार यांना देण्यात आले.

माघ एकादशीनिमित्त ३ लाख भाविकांनी घेतले श्रीविठ्ठलाचे दर्शन !

२ वर्षांनंतर वारी भरल्यामुळे भाविकांत उत्साहाचे वातावरण

(म्हणे) ‘ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांना पंढरपुरात पाऊल ठेवू देणार नाही !’ 

सरकारच्या मद्यविक्रीच्या निर्णयाला विरोध करतांना ह.भ.प. कराडकर यांनी सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला होता. त्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या महिला नेत्यांनी ही धमकी दिली आहे.

संतवीर आणि ‘व्यसनमुक्त युवक संघा’चे संस्थापक ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांना अटक नाही ! – सातारा पोलीस

कोरोनाच्या काळात आंदोलन केल्या प्रकरणी बंडातात्या कराडकर यांच्याविरोधात सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून पोलिसांनी त्यांची चौकशी केली. ‘ते चौकशीला सहकार्य करत असल्यामुळे त्यांना अटक नाही – सातारा पोलीस

वारकर्‍यांनो, धर्मावरील आघात रोखण्यासाठी सक्षम कायदा करण्याची शासनकर्त्यांकडे मागणी करा !

साहित्य परिषदेच्या निमित्ताने ह.भ.प. मारुति महाराज तुनतुने शास्त्री यांचे वारकर्‍यांना आवाहन

माघवारी पालखी सोहळ्याची परंपरा टिकवण्यासाठी वारीला अनुमती द्यावी !

अखिल भाविक वारकरी मंडळाच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

समस्त वारकरी फडकरी दिंडी समाज संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी ह.भ.प. संजय महाराज देहूकर !

वारकरी संप्रदायातील शिखर संघटना म्हणून ओळख असलेल्या समस्त वारकरी फडकरी दिंडी समाज संघटनेची सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. यात संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी ह.भ.प. संजय महाराज देहूकर यांची निवड करण्यात आली.

श्रद्धेय कालिचरण महाराज यांच्यावर टीका करणार्‍यांनी ते हिंदूंचे धर्मगुरु आहेत, हे विसरू नये ! – ह.भ.प. अरुण महाराज पिंपळे, राष्ट्रीय वारकरी परिषद

जगातील हिंदूंचा निर्वंश होऊ नये आणि देशातील हिंदू समाज गुलाम होऊ नये यासाठी कालीपूत्र कालिचरण महाराज प्रचार अन् प्रसार करत आहेत. त्यांचे कार्य बंद पाडण्यासाठी, तसेच त्यांना अपकीर्त करण्यासाठी सुनियोजित प्रयत्न चालू आहेत.

हिंदु राष्ट्रासाठी संघटित होणे हीच काळाची आवश्यकता ! – ह.भ.प. मारुति महाराज तुणतुणे, राष्ट्रीय वारकरी परिषद

पू. ह.भ.प. वक्ते महाराज यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त लोणी (जिल्हा नगर) येथे वारकरी अधिवेशन संपन्न