नगर येथे वाईन विक्रीच्या विरोधात राष्ट्रीय वारकरी परिषदेच्या वतीने निवेदन !

नायब तहसीलदार सौ. पुनमताई दंडिले यांना निवेदन देतांना वारकरी

नगर – राज्य सरकारने मॉल आणि किराणा दुकानांमध्ये वाईन विक्री च्या संदर्भात घेतलेला निर्णय त्वरित मागे घ्यावा, यासाठीचे निवेदन ‘राष्ट्रीय वारकरी परिषद महाराष्ट्र राज्य’च्या अंतर्गत नगर जिल्ह्यातील ‘राष्ट्रीय वारकरी परिषद राहुरी तालुका कोअर कमिटी’च्या वतीने राहुरी तालुका नायब तहसीलदार सौ. पुनमताई दंडिले यांना ११ फेब्रुवारी या दिवशी देण्यात आले. या वेळी राष्ट्रीय वारकरी परिषदेचे राष्ट्रीय प्रचारक ह.भ.प. वेणुनाथ महाराज विखे, परिषदेच्या नगर जिल्ह्याच्या उत्तर विभागाचे उपाध्यक्ष ह.भ.प. बापूसाहेब महाराज हारद, परिषदेचे राहुरी तालुक्याचे उपाध्यक्ष ह.भ.प. कैलास म. झुगे, ह.भ.प. बाळासाहेब महाराज ढमढेरे, ह.भ.प. विलास म. माने, ह.भ.प. शंकर महाराज पवार आणि इतर महाराज उपस्थित होते.