राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या महिलांची धमकी
दारूबंदीसाठी आक्रोश आणि आंदोलने करणार्या गावोगावच्या महिलांसाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेसने कधी चकार शब्दही काढला नाही, हे लक्षात घ्या !

सोलापूर – ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांना वारकरी संप्रदायातून काढून टाकण्यात यावे, तसेच कराडकर यांना पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथे पाऊल ठेवू देणार नाही, अशा शब्दांत सोलापूर आणि पंढरपूर येथील राष्ट्रवादी युवती काँग्रेसने धमकी दिली आहे. बंडातात्या कराडकर यांनी वाईन विक्रीच्या विरोधातील आंदोलनाच्या वेळी केलेले वक्तव्य निंदनीय असून संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांचा हा अपमान आहे. त्यामुळे त्यांच्यावर फौजदारी गुन्हा नोंद करावा, या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा श्रीया भोसले यांनी पंढरपूरचे उपविभागीय पोलीस अधीक्षक विक्रम कदम यांना दिले आहे. सरकारच्या मद्यविक्रीच्या निर्णयाला विरोध करतांना ह.भ.प. कराडकर यांनी सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला होता. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या महिला नेत्यांनी ही धमकी दिली आहे.

या वेळी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा श्रीया भोसले म्हणाल्या, ‘‘बंडातात्या कराडकर यांना श्री विठ्ठलाच्या मंदिराची पायरी चढू देणार नाही आणि त्यांनी तसा प्रयत्न केल्यास त्यांच्या तोंडाला काळे फासल्याविना रहाणार नाही.’’ (महिलांची छेड काढणारे, बलात्कार करणारे यांना कठोर कारवाई होण्यासाठी अशी आक्रमक भूमिका कधी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या महिला नेत्यांनी घेतली आहे का ? – संपादक) या वेळी विविध महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
हिंदूंनी ‘कॉर्पोरेट जिहाद’ प्रकरणातून शत्रूबोध घ्यावा ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
कल्याण येथे नालेसफाईसाठी बालकामगाराचा वापर; ठेकेदाराविरुद्ध गुन्हा नोंद
सातारा येथे व्यावसायिक लाभासाठी महामार्गावरील रस्ते दुभाजक फोडले
महामार्गांवरील फलकांवर ‘अहिल्यानगर’ आणि ‘छत्रपती संभाजीनगर’ नावे त्वरित लावावीत !
तिन्ही आरोपींना ६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी
छत्रपती संभाजीनगर येथे आंतरजिल्हा शस्त्र तस्करीची यंत्रणा उद्ध्वस्त; १० आरोपींना अटक