माघवारी पालखी सोहळ्याची परंपरा टिकवण्यासाठी वारीला अनुमती द्यावी !

अखिल भाविक वारकरी मंडळाच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

नायब तसीलदार संदीप लोमटे यांना निवेदन देतांना अ.भा.वा. मंडळाचे पदाधिकारी

सोलापूर, २२ जानेवारी (वार्ता.) – २०० वर्षांहून अधिक परंपरा असणारा माघवारी पालखी सोहळ्याची परंपरा टिकवण्यासाठी १०० भाविकांना दिंडीमध्ये सहभागी होण्यास अनुमती द्यावी, तसेच पालखी सोहळा आणि रिंगण सोहळा यांसही अनुमती द्यावी, अशी मागणी अखिल भाविक वारकरी मंडळाच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन नायब तसीलदार संदीप लोमटे यांनी स्वीकारले. १२ फेब्रुवारी या दिवशी माघ एकादशी असून ‘आरोग्य विभागाचे सर्व नियम आणि अटी यांचे पालन करू’, असे अखिल भाविक वारकरी मंडळाने निवेदनाद्वारे सांगितले आहे. या वेळी अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज, राष्ट्रीय सचिव ह.भ.प. बळीराम जांभळे, वारकरी मंडळाचे जिल्हाध्यक्ष ज्योतीराम चांगभले, यांसह मोहन शेळके, किरण चिप्पा आदी पदाधिकारी उपस्थित होते.