पुण्यात वारकऱ्यांच्या निवासासाठी अवघे २ मंडप !

कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे या वर्षी आषाढी वारी मोठ्या प्रमाणात होणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले; मात्र पुण्यामध्ये वारकऱ्यांच्या निवासासाठी अवघे दोनच मंडप टाकण्यात आले आहेत.

अंकली (बेळगाव) येथून टाळ मृदुंगाच्या गजरात हिरा-मोती अश्वांचे आळंदीकडे प्रस्थान !

हे अश्व २० जून या दिवशी आळंदीत पोचणार आहेत. या अश्वप्रस्थान सोहळ्यास श्रीमंत उर्जितसिंह शितोळे, महादजी शितोळे, हैबतबाबांचे वंशज बाळासाहेब आरफळकर, ज्ञानेश्वर गुंळुजकर, निवृत्ती चव्हाण, राहुल भोर यांच्यासह वारकरी उपस्थित होते.

पालखी मार्ग आणि पालखी तळावरील सर्व प्रलंबित कामे मार्गी लावावीत !

आढावा बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांची सूचना

संत ज्ञानेश्वर महाराज मृदंग वादन शिक्षण संस्थेच्या वतीने ‘मृदंग तपस्या’ कार्यक्रम !

शहरातील महादेव मंदिर, जुनी लक्ष्मी चाळ येथे २२ मे ते २९ मे या कालावधीत सोलापूर येथील संत ज्ञानेश्वर महाराज मृदंग वादन शिक्षण संस्थेच्या वतीने ‘मृदंग तपस्या’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

वारीकाळात महिला वारकऱ्यांची वैयक्तिक स्वच्छता आणि सुरक्षा यांविषयी नवीन निर्देश लागू !

या निर्देशांनुसार वारी काळात दर १० ते २० कि.मी. अंतरावर वारकरी महिलांसाठी शौचालय अन् न्हाणीघर यांची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहे. असे निर्देश का द्यावे लागतात ? प्रशासनाच्या ते लक्षात येत नाही का ?

सोलापुरात हिंदुतेजाचा हुंकार !

सनातन संस्था जी साधना सांगते, त्याच मार्गाद्वारे मानवी जीवन, समाज आणि अंतिमत: राष्ट्र निर्मितीच्या कार्यात मोलाचा वाटा उचलला जाणार आहे. हा विश्वास सार्थ ठरवत सोलापूर येथे १५ मे या दिवशी झालेल्या ‘हिंदू एकता दिंडी’साठी सहस्रोंच्या संख्येने जनसमुदाय लोटला.

आषाढी वारीपूर्वी रस्त्यांची कामे पूर्ण करा ! – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

आषाढी वारीसाठी प्रत्येक विभागाने समन्वयाने काम करावे. वारीमध्ये वारकऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी. पालखी मार्ग, धर्मपूरी विसावा, मांडवी येथील रस्त्यांची कामे त्वरित पूर्ण करावीत…

चाळीसगाव (जिल्हा जळगाव) येथे पोलीस निरीक्षक के.के. पाटील यांनी कीर्तन बंद पाडले !

कीर्तन बंद पाडायला हा देश भारत आहे कि पाकिस्तान ? असा प्रकार करण्याचे धाडस पोलिसांनी अन्य धर्मियांच्या कार्यक्रमांच्या वेळी दाखवले असते का ?

वारकऱ्यांची गैरसोय टाळा !

चैत्र वारीला एवढ्या मोठ्या प्रमाणात भाविकांची उपस्थिती असेल, याचा कदाचित् विचारच न झाल्याने ‘श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती’ आणि प्रशासन यांच्या नियोजनाचा अभाव नेहमीप्रमाणे दिसून आला.

वारकर्‍यांच्या ट्रॅक्टरला भरधाव ट्रकने धडक दिल्याने ५ वारकरी ठार, तर अनेकजण घायाळ !

घायाळ झालेल्या चौघांची प्रकृती गंभीर आहे. ही घटना सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील कोंडी गावाजवळ १३ मार्चच्या रात्री घडली.