संपूर्ण आयुष्य केवळ धर्मासाठी देऊन धर्मविरोधी शक्तींच्या विरोधात लढा देणार ! – हिंदुभूषण ह.भ.प. श्यामजी महाराज राठोड

धर्मविरोधी शक्तींना हद्दपार करण्यासाठी संपूर्ण आयुष्य धर्मासाठी समर्पित करीन आणि साधूंची हत्या झालेल्या ठिकाणी हिंदु शक्तीपिठाची निर्मिती करणार, असा संकल्प वृंदावन धामचे हिंदुभूषण ह.भ.प. श्यामजी महाराज राठोड यांनी या वेळी केला.

एस्.टी. कर्मचार्‍यांच्या संपामुळे अनेक वारकरी श्री विठ्ठलाच्या दर्शनाला मुकले !

देशभरातील कानाकोपर्‍यांतून श्री विठ्ठलाचे भक्त कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे येतात. एस्.टी. कर्मचार्‍यांच्या संपामुळे अनेक वारकर्‍यांना कार्तिकी यात्रेनिमित्त पंढरपूर येथे येता आले नाही.

मोर्च्यांच्या नावाखाली महाराष्ट्रात दहशत निर्माण करणार्‍या धर्मांधांवर कठोर कारवाई करावी ! – राष्ट्रीय वारकरी परिषद

मुसलमान समाजाने मोर्च्यांच्या नावाखाली एक प्रकारे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, असे सामाजिक माध्यमांतून प्रसारित होणार्‍या ‘व्हिडिओ’मध्ये दिसत आहे.

पळसखेड पिंपळे (जिल्हा जालना) येथे शिवचरित्र पारायण सोहळा आणि धर्मसभा !

भोकरदन तालुक्यातील पळसखेड पिंपळे गावात शिवचरित्र पारायण सोहळा आणि धर्मसभेचे आयोजन करण्यात आले. हिंदु राष्ट्राच्या निर्मितीसाठी शिवचरित्रातून जनजागृती करण्यात आली.

पंढरपूरकडे जाणारे मार्ग भागवत धर्माची पताका उंचावणारे महामार्ग ठरतील ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंढरपूर येथे संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गांच्या चौपदरीकरणाच्या कामाची पंतप्रधानांच्या हस्ते पायाभरणी !

कार्तिकी वारीसाठी आरोग्य विभागाच्या अनुमतीची आवश्यकता नाही ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

कोरोनाच्या संसर्गाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर प्रथमच पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या कार्तिकी वारीसाठी आता स्वतंत्र अनुमतीची आवश्यकता भासणार नाही, असे आरोग्यमंत्री यांनी स्पष्ट केले.

२० मासांनंतर कार्तिकी यात्रा भरणार !

कोरोनाच्या संसर्गाच्या सर्व नियमांचे पालन करत कार्तिकी यात्रा भरवण्यास जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे साधारण २० मासांनंतर पंढरपूर येथे कार्तिकी यात्रा भरणार आहे. 

कार्तिक वारीसाठी ६ ते २४ नोव्हेंबर या कालावधीत २४ घंटे मुखदर्शन ! – मंदिर समितीचा निर्णय

यात्रेला येणार्‍या भाविकांना लसीकरणाची कोणतीही अट न घालण्याचा निर्णय बैठकीत झाला असून मुखपट्टी आणि सामाजिक अंतराचे नियम मात्र पाळले जाणार आहेत.

कार्तिक वारी पूर्ववत् करण्यासाठी अखिल भाविक वारकरी मंडळाचे निवेदन !

कोरोना संसर्गामुळे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाच्या सर्व परंपरांवर निर्बंध घालण्यात आले होते. आता ते सर्व निर्बंध शिथिल करून महाराष्ट्रातील सर्व वारकर्‍यांचे श्रद्धास्थान असणारी कार्तिकी वारी सध्या पूर्ववत् चालू करण्यासाठी प्रशासनाने सहकार्य करावे, या मागणीचे निवेदन…

‘हलाल जिहाद’च्या षड्यंत्राविषयी माझ्या कार्यक्रमांतून जनजागृती करेन ! – ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज, अध्यक्ष, अखिल भाविक वारकरी मंडळ

या जागतिक षड्यंत्राविषयी मला कोणतीही माहिती नव्हती; मात्र यापुढे मी माझ्या कार्यक्रमांतून याविषयी जागृती करेन, असे आश्वासन ‘अखिल भाविक वारकरी मंडळा’चे अध्यक्ष ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज यांनी केले.