महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरांचे टप्प्याटप्प्याने संवर्धन करणार !

सांस्कृतिक ठेव्याचे जतन आणि संवर्धन करणे हे आपले कर्तव्य आहे. राज्यातील प्राचीन मंदिरांचे टप्प्याटप्प्याने संवर्धन करणार आहोत, अशी महाराष्ट्र शासनाच्या वतीने नवीन योजनेची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत केली.

विधानसभेतील अर्णव गोस्वामी आणि अभिनेत्री कंगना राणावत यांच्या हक्कभंगाच्या प्रस्तावाला मुदतवाढ

सभागृहाच्या कामकाजात हस्तक्षेप झाला, तरच हक्कभंग करता येतो. शासनाला हक्कभंगाची व्याप्ती वाढवायची असल्यास वाढवता येईल; मात्र एखाद्या प्रकरणासाठी कायदा अस्तित्वात असतांना त्यासाठी हक्कभंग आणून सभागृहाचा वेळ घालवणे योग्य नाही.

शेतकर्‍यांचे प्रश्‍न आणि आरक्षण यांच्या प्रश्‍नांवरून विरोधकांचे विधीमंडळाच्या पायर्‍यांवर आंदोलन

मराठा आणि इतर मागासवर्गीय समाज यांच्या आरक्षणाचा प्रश्‍न, अतीवृष्टीमुळे झालेली शेतीची हानी, शेतीचे अन्य प्रश्‍न आदींवरून विरोधकांनी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधीमंडळाच्या पायर्‍यांवर शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली.

मुख्यमंत्र्यांचा बंगला थकबाकीदार सूचीत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य अनेक मंत्र्यांचे बंगले मुंबई महापालिकेने थकबाकीदार सूचीत टाकले आहेत. लाखो रुपयांची पाणीपट्टी थकवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे

महाराष्ट्रात जर अघोषित आणीबाणी असेल, तर देशात घोषित आणीबाणी आहे का ? – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार कधी पडेल किंवा सरकार कधी पडेल ? हे मुहूर्त शोधण्यात विरोधकांचे वर्ष गेले. सरकारने कोणती कामे केली आहेत, याकडे विरोधकांनी पाहिले नाही. सरकारने केलेल्या विकासकामांची आम्ही पुस्तिका काढली आहे. राज्य सरकारविषयी जनतेमध्ये कोणतीही अप्रसन्नता नाही…..

मी घरी बसून विकासकामे मार्गी लावली ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

संभाजीनगर येथे १ सहस्र ६८० कोटी रुपयांच्या जलयोजनेचा शुभारंभ

महाराष्ट्रातील सर्वच मंदिरांमध्ये भारतीय संस्कृती अनुरूप वस्त्रसंहिता लागू करावी ! – हिंदु जनजागृती समिती

अशी मागणी प्रत्येक हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि धर्मप्रेमी हिंदू यांनी करावी ! मुळात अशी मागणी हिंदूंना करण्यासही लागू नये, सरकारने ती स्वतःहून करून हिंदूंच्या सदिच्छा घ्याव्यात, असेच हिंदूंना वाटते !

प्रसिद्धीलोलूप तृप्ती देसाई यांच्यावर कडक कारवाई करा ! – राष्ट्रीय वारकरी परिषदेची मागणी

प्रसिद्धीच्या हव्यासापोटी फलक काढण्यास गेलेल्या तृप्ती देसाईंना अटक करण्यात आली असली, तरी त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रीय वारकरी परिषदेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

आमदार अरुणअण्णा लाड यांनी घेतली सदस्यत्वाची शपथ

पुणे पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार अरुण अण्णा लाड यांनी विधानभवनात विधान परिषद सदस्यत्वासमवेत गोपनियतेची शपथ घेतली.

पैठण येथील संत ज्ञानेश्‍वर उद्यानाचा होणार कायापालट

संभाजीनगर जवळील पैठण येथील संत ज्ञानेश्‍वर उद्यानाचा संपूर्ण कायापालट करून देश-विदेशातील पर्यटकांना तेथे आकर्षित करण्यासाठी नागरिकांकडून नाविन्यपूर्ण कल्पना मागवा, तसेच जागतिक स्तरावरील सल्लागारही नियुक्त करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.