पाण्याची थकबाकी एकूण २४ लाख ५६ सहस्र ४६९ रुपये

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य अनेक मंत्र्यांचे बंगले मुंबई महापालिकेने थकबाकीदार सूचीत टाकले आहेत. लाखो रुपयांची पाणीपट्टी थकवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. (शासकीय विभाग पाण्याचे देयक वेळेवर भरत नसेल, तर सर्वसामान्यांनी का भरावे? महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल मंत्र्यांच्या निवासस्थानांचे पाणी रोखण्याचे धैर्य करणार का? – संपादक) मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यासह इतर मंत्र्यांच्या सरकारी निवासस्थानाची पाण्याची थकबाकी एकूण २४ लाख ५६ सहस्र ४६९ रुपये इतकी आहे. माहिती अधिकार कार्यकर्त्याने मुंबई महापालिकेच्या संकेतस्थळावरून पाण्याच्या थकबाकीदारांची माहिती संकलित केली आहे.
नेत्रदीपक रिंगण आणि बंधूभेटीनंतर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज अन् जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पंढरपूरमध्ये आगमन !
जलदगती न्यायालये स्थापन करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत ! – डॉ. सावंत, मुख्यमंत्री
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा आजपासून खांडोळा येथून शुभारंभ होणार
‘मराठी अभ्यास केंद्रा’ची मराठी शाळांतील इंग्रजी बालवाड्यांविरुद्ध बैठक !
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गोमांसाची तस्करी करणारे वाहन पकडले; दीड टन मांस जप्त
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन !