संभाजीनगर येथे १ सहस्र ६८० कोटी रुपयांच्या जलयोजनेचा शुभारंभ

संभाजीनगर – कोरोना महामारीच्या संकटाच्या काळात मी नुसता घरी बसून नव्हतो. राज्याच्या विकासाचे प्रश्न मार्गी लावत होतो. त्यामुळेच विविध कामांची उद्घाटने होत आहेत. मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत, अशी टीका करणार्यांना आम्ही काय केले हे लवकरच दिसेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १२ डिसेंबर या दिवशी येथे केले. राज्यातील सर्वांत मोठ्या १ सहस्र ६८० कोटी रुपयांच्या जलयोजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.
या वेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले की, बीड-जालना येथे २०० कोटी रुपयांची गुंतवणूक, वॉटर ग्रीडसाठी २६५ कोटी रुपये, शेंद्रा-बिडकीन कॉरिडॉर, तसेच ऑरिक सिटीत आयटी बेस आणि मोठे उद्योग आणण्याचे प्रयत्न चालू आहेत. टाटा कन्सल्टन्सीशी बोलणी झाली आहेत. आरोग्याच्या सुविधांसाठीही उद्योग पार्क सिद्ध करण्यात येईल.
सिंहासन नको, आसंदीच बरी !
पाणीपुरवठा योजनेच्या भूमीपूजन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी सिंहासनासारख्या आसंदीची व्यवस्था करण्यात आली होती. व्यासपिठावर एक सिंहासनासारखी आसंदी आणि सहकारी मंत्र्यांसाठी साध्या आसंद्या पहाताच मुख्यमंत्र्यांनी तात्काळ सिंहासनासारखी आसंदी काढायला सांगून साधी आसंदी मागवली. मुख्यमंत्र्यांनी सूचना देताच त्यांचे सुरक्षारक्षक आणि आयोजक यांची धावपळ उडाली. त्यांनी तात्काळ सिंहासनासारखी आसंदी काढून साधी आसंदी ठेवली. |

अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याने हॉटेल, बेकरी, डेअरी यांचे परवाने निलंबित !
साजिद सरगुरो आणि मुराद अडरेकर यांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून समाजात द्वेष पसरवला !
प्रवाशांना नेहमी स्वच्छ आणि वापरण्यायोग्य सुविधा उपलब्ध करून द्या !
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे सखोल सर्वेक्षण करून उत्कृष्ट परिसंस्था निर्माण करा ! – मुख्यमंत्री
कर्नाटकात शाळांजवळ पिझ्झा-बर्गर यांच्या विक्रीवर लवकरच बंदी !
दोडामार्गमध्ये गायरान भूमीवर काळ्या दगडाच्या खाणीला ग्रामस्थांचा विरोध !