जागतिक स्तरावरील सल्लागार नियुक्त करा ! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई – संभाजीनगर जवळील पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाचा संपूर्ण कायापालट करून देश-विदेशातील पर्यटकांना तेथे आकर्षित करण्यासाठी नागरिकांकडून नाविन्यपूर्ण कल्पना मागवा, तसेच जागतिक स्तरावरील सल्लागारही नियुक्त करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. ८ डिसेंबर या दिवशी वर्षा येथील समिती सभागृहात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
या वेळी मुख्यमंत्री म्हणाले की, पैठणला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. संभाजीनगर परिसरात आलेले पर्यटक पैठणला आवर्जून भेट देतात, तसेच या ठिकाणी जायकवाडीसारखे देशातील मोठे धरण आहे. त्यामुळे येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाची दुरवस्था दूर करून जागतिक दर्जाचे उद्यान या ठिकाणी बनायला हवे. या वेळी जलसंपदा प्रधान सचिव लोकेश चंद्र यांनी सांगितले की, २०० एकर भूमीवरील संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या सौंदर्यीकरणासाठी विभागाने ४० कोटी रुपयांचा प्रस्ताव केला आहे. या ठिकाणी ‘वॉटर पार्क’, खेळणी आणि प्राणीसंग्रहालय, ‘थीम पार्क’ उभारण्याचे नियोजन आहे.
जलदगती न्यायालये स्थापन करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत ! – डॉ. सावंत, मुख्यमंत्री
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा आजपासून खांडोळा येथून शुभारंभ होणार
‘मराठी अभ्यास केंद्रा’ची मराठी शाळांतील इंग्रजी बालवाड्यांविरुद्ध बैठक !
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गोमांसाची तस्करी करणारे वाहन पकडले; दीड टन मांस जप्त
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन !
आजच्या थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या (२४.७.२०२६)