येत्या निवडणुकीत मराठा समाज काँग्रेसविरोधात भूमिका घेणार !

सकल मराठा समाजाची चेतावणी

सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार

सोलापूर – काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार हे मराठा समाजावर बेताल वक्तव्य करत आहेत. त्यासाठी येत्या निवडणुकीत मराठा समाज काँग्रेसविरोधात भूमिका घेणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी दिली.

 (सौजन्य : TV9 Marathi)

महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष उभा करण्यामागे मराठा समाजाचे मोठे योगदान आहे. तरीही मंत्री विजय वडेट्टीवार हे मराठा समाजाला ओबीसीच्या आरक्षणासाठी विरोध करत आहेत. हे दुर्दैवी आहे. काँग्रेस पक्षाच्या राज्यातील आणि देशातील नेतृत्वाने याचा गांभीर्याने विचार करावा. अन्यथा मराठा समाजाच्या मतपेढीस भविष्यात होणार्‍या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाला मुकावे लागेल, अशी चेतावणी सकल मराठा समाजाकडून देण्यात आली आहे.