पर्यटकांच्या दायित्त्वशून्य वागण्यामुळे राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती

पणजी – राज्यातील एक प्रमुख पर्यटनस्थळ असलेल्या कळंगुट समुद्रकिनार्‍यावर गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत आहेत. मास्क घालणे, सामाजिक अंतर पाळणे आदी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासंबंधीचे दक्षतेचे उपाय पर्यटक करत नसल्याने राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पर्यटकांमध्ये कोरोनाविषयी कोणतीही भीती राहिलेली नाही, असे चित्र दिसत आहे.

इंग्लंड येथे कोरोनाचा नवीन विषाणू सापडला आहे आणि इंग्लंड येथून पर्यटक गोव्यात आलेले आहेत. या पार्श्‍वभूमीवर कोरोनाचा अथवा कोरोनाच्या नवीन विषाणूचा संसर्ग गोव्यात होऊ नये, यासाठी सर्वच स्तरांवर प्रयत्न चालू असतांना पर्यटकांचे दायित्वशून्य वागणे चिंता वाढवणारे ठरत असल्याची सार्वत्रिक प्रतिक्रिया उमटत आहे.