खासदार सुजय विखे-पाटील यांच्या विरोधातील याचिका निकाली !

नगर येथील भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांनी १० सहस्र रेमडेसिविर इंजेक्शन विमानातून आणल्याप्रकरणी येथील खंडपिठात प्रविष्ट केलेली याचिका न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती बी.यू. देबडवार यांनी ५ मे या दिवशी निकाली काढली.

८ वर्षांच्या मुलाला विष पाजून आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍या पित्याला जन्मठेप

कौटुंबिक कलहातून ८ वर्षांच्या मुलाला विष पाजून स्वत: आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍या वडिलांना जिल्हा मुख्य न्यायाधीश आर्.डी. सावंत यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.

देहलीमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा अपुरी 

देहलीमध्ये कोरोनामुळे मोठ्या संख्येने रुग्णांचे मृत्यू होत आहेत. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमी आणि कब्रस्तान येथे रांगा लागल्या आहेत. २-३ दिवस वाट पाहिल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी जागा मिळत आहे.

ऑक्सिजनच्या अभावी होणारे मृत्यू म्हणजे नरसंहारच ! – अलाहाबाद उच्च न्यायालय

रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे लोकांचे प्राण जात आहेत, हे पाहून आम्हाला दुःख होत आहे. हे गुन्हेगारी कृत्य असून ते नरसंहारापेक्षा अल्प नाही, अशी टिप्पणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेच्या सुनावणीच्या वेळी केली.

तुम्ही आंधळे असू शकता, आम्ही नाही !

न्यायालयाने ‘येथे लोकांचे प्राण पणाला लागले असून हे भावनिक सूत्रच आहे’, असे सांगितले. देहलीतील कोरोना परिस्थितीच्या संदर्भात प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकांवर सुनावणीच्या वेळी न्यायालयाने कठोर शब्दांत संताप व्यक्त केला.

आमदार संजय शिरसाट यांच्यावर कोणती कलमे लावली ?

कोरोनाचे संकट गडद होत असतांना लोकप्रतिनिधींनी याचे भान ठेवून सार्वजनिक गर्दीचे कार्यक्रम टाळावेत !

रेमडेसिविर इंजेक्शनचा नियमित पुरवठा आणि सामायिक वितरणाविषयी राज्य आणि केंद्र सरकारला महत्त्वाचे निर्देश

न्यायालयाला केंद्र आणि राज्य सरकार यांना निर्देश देऊन कामे करवून घ्यावी लागतात, हे लज्जास्पद आहे. सर्व यंत्रणा हाताशी असतांना न्यायालयाला निर्देश द्यावे लागतात, याचा सरकारने विचार करावा !

मुसलमानांचे धोकादायक ध्रुवीकरण !

भाजपच्या वाढलेल्या जागांच्या मागे हिंदूंच्या मतांचे ध्रुवीकरण झाले, असेही सांगितले जात आहे; मात्र हिंदूंच्या ध्रुवीकरणाला मुसलमानांच्या मतांच्या ध्रुवीकरणाने धोबीपछाड दिली, हे हिंदूंना स्वीकारावे लागेल.

माजी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम्. श्रीनिवास रेड्डी यांना न्यायालयीन कोठडी !

वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात सहआरोपी असलेले प्रकल्प संचालक तथा अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम्. श्रीनिवास रेड्डी यांची १ मे या दिवशी न्यायालयीन कोठडीत पाठवणी करण्यात आली.

आता पाणी डोक्यावरून गेले आहे, आजच्या आज ऑक्सिजन पुरवा !

न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारतांना म्हटले की, आम्ही केंद्र सरकारला निर्देश देतो की, त्यांनी काहीही करून देहलीला आजच्या आज ४९० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवावा. त्यासाठीचे टँकर पुरवण्याचे दायित्वही केंद्राचेच आहे.