देहली उच्च न्यायालयाकडून देहली सरकार आणि महापालिका यांना नोटीस !
नवी देहली – देहलीमध्ये कोरोनामुळे मोठ्या संख्येने रुग्णांचे मृत्यू होत आहेत. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमी आणि कब्रस्तान येथे रांगा लागल्या आहेत. २-३ दिवस वाट पाहिल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी जागा मिळत आहे. याविषयी देहली उच्च न्यायालयात याचिका करून सरकारला जागा वाढवण्यासाठी आदेश देण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यावर झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने देहली सरकार आणि ३ महापालिका यांना यावर उत्तर देण्याची नोटीस पाठवली आहे.