आतंकवाद पसरवणार्‍या देशाशी संबंध ठेवू शकत नाही ! – परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर

एस्. जयशंकर म्हणाले, सीमापार वाढणारा आतंकवाद संपवायला हवा. आम्हाला आशा आहे की एक दिवस आम्ही तो टप्पा गाठू.

हिजबुल मुजाहिदीनचा प्रमुख सलाहुद्दीन याच्या मुलाची संपत्ती जप्त

हा मुलगाही आतंकवादी आहे. सध्या आतंकवाद्यांना अर्थपुरवठा केल्याच्या प्रकरणी तो अटकेत आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवादी आक्रमणात ५ सैनिक वीरगतीला प्राप्त

जिहादी आतंकवाद्यांचे मूळ म्हणजे पाकिस्तानला जोपर्यंत नष्ट केले जात नाही, तोपर्यंत काश्मीरमधील आतंकवाद संपुष्टात येणार नाही, हे सरकारने लक्षात घेणे आवश्यक आहे !

सीरियामध्ये इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांच्या आक्रमणात ३१ नागरिक ठार

आतंकवाद्यांनी येथील वाळवंटामध्ये सर्वत्र भूसुरुंग पेरलेले आहेत. याविषयी प्रशासनाकडून लोकांना सूचना देण्यात आल्या असतांनाही ते मशरूम काढण्यासाठी जात असल्याने भूसुरुंगांचा स्फोट होऊन त्यांचा मृत्यू होत आहे.

पाकिस्तानमध्ये पवित्र गुरुद्वाराच्या दर्शनासाठी गेलेल्या भारतियांना खलिस्तानी आतंकवाद्याने खलिस्तानसाठी चिथावले !

(म्हणे) ‘शिखांसाठी स्वतंत्र देश हवा !’

सीमेपलीकडून ड्रोनद्वारे शस्त्रे पाठवणार्‍या देशांना उत्तरदायी ठरवा ! – रचिरा कंबोज, संयुक्त राष्ट्रांमधील भारताच्या राजदूत

भारताने संयुक्त राष्ट्रांत पाकचे नाव न घेता अशा प्रकारे मागणी करणे अपेक्षित नाही, तर स्वतः पाकवर थेट कारवाई करून पाकचा उपद्रव रोखणे आवश्यक आहे ! अन्य देश संयुक्त राष्ट्रांमध्ये रडगाणे न गाता स्वतः थेट कारवाई करतात !

आफ्रिका खंडातील ३ देशांमध्ये इस्लामिक स्टेटच्या आक्रमणात १४४ जण ठार !

जगभरात जिहादी आतंकवादी लोकांना ठार करत असतांना जगातील एकतरी इस्लामी संघटना, त्यांचे नेते, प्रमुख धर्मगुरु कधी त्यांचा विरोध करत नाहीत, हे लक्षात घ्या !

आसाममध्ये ‘पी.एफ्.आय.’ या  प्रतिबंधित संघटनेच्या ३ सदस्यांना अटक !

पी.एफ्.आय.वर केवळ बंदी घालणे पुरेसे नसून त्याची पाळेमुळे खणून काढण्यासाठी सुरक्षायंत्रणांना कसोशीने प्रयत्न करावे लागतील, हेच यातून दिसून येते !

पाकिस्तान जिहादी आतंकवाद्यांच्या विरोधात धडक कारवाई करणार !

जिहादी आतंकवाद्यांचा निर्माता असणार्‍या पाकने अशा प्रकारची कारवाई करण्याला प्रारंभ करणे, याला विनोदच म्हणावा लागेल !

जम्मू-काश्मीरमधील आतंकवाद्यांची संख्या झाली अल्प ! – पोलीस महासंचालक  

काश्मीरमधील आतंकवाद्यांची संख्या अल्प झाली, असे म्हटले, तरी अद्यापही काश्मीरमध्ये हिंदू असुरक्षितच आहेत. भारतातील कोणत्याही राज्यातील हिंदू तेथे जाऊन राहू शकत नाहीत, अशीच स्थिती आहे !