TTP Terrorists In Afghanistan : अफगाणिस्तानात टीटीपीचे ५-६ सहस्र आतंकवादी ! – पाकिस्तान

(टीटीपी म्हणजे ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’)

प्रतिकात्मक छायाचित्र

इस्लामाबाद (पाकिस्तान) – ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ (टीटीपी) या आतंकवादी संघटनेचे ५-६ सहस्र आतंकवादी अफगाणिस्तानमध्ये असल्याचा दावा अफगाणिस्तानातील पाकिस्तानचे राजदूत आसिफ दुर्रानी यांनी केला आहे. इस्लामाबादमधील ‘पाकिस्तान इन्स्टिट्यूट फॉर पीस स्टडीज’ या संस्थेने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलतांना दुर्रानी म्हणाले की, जर आपण आतंकवाद्यांच्या कुटुंबांचाही समावेश केला, तर हा आकडा ७० सहस्रांपेक्षा अधिक आहे. २ दिवसांपूर्वी टीटीपीच्या आक्रमणात पाक सैन्याचे २ अधिकारी आणि ७ सैनिक ठार झाले होते.

आसिफ दुर्रानी पुढे म्हणाले की, पाकिस्तान आणि टीटीपी यांच्यातील शांतता चर्चेचे अनेक प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत. टीटीपीचे आतंकवादी ना शरणागती पत्करण्यास सिद्ध आहेत ना ते पाकिस्तानची राज्यघटना स्वीकारण्यास सिद्ध आहेत. अफगाणिस्तानचे अंतरिम सरकार एवढ्या मोठ्या संख्येने लोकांचा दैनंदिन खर्च भागवण्यास सक्षम नसल्याने कुणीतरी त्यांना पैसे देत असल्याचे दिसते. टीटीपीचे आतंकवादी पेशावरमधील आर्मी पब्लिक स्कूलवरील आक्रमणासह त्यांच्या अन्य गुन्ह्यांसाठी कायद्याला सामोरे जाण्यासही सिद्ध नाहीत. टीटीपी हा पाकिस्तानसाठी धोका आहे आणि पाकिस्तान सरकारने तालिबान सरकारला स्पष्टपणे सांगितले आहे की, टीटीपीच्या आतंकवाद्यांना शरण जावे लागेल आणि त्यांना शस्त्रे खाली ठेवावी लागतील.

संपादकीय भूमिका

  • भारतात आतंकवादी पाठवून कारवाया घडवून आणणार्‍या पाकला आता टीटीपीद्वारे पापाचे फळ मिळत आहे, असे कुणी म्हटल्यास चुकीचे ठरू नये !