सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग किल्ल्यांसह कातळशिल्पांना जागतिक वारसा नामांकन मिळण्याच्या प्रस्तावास तत्त्वत: मान्यता

या नामांकन प्रक्रियेत रायगड, राजगड, शिवनेरी, तोरणा, प्रतापगड, लोहगड, पन्हाळा, रांगणा, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, पद्मदुर्ग, कुलाबा आदी किल्ल्यांचा समावेश आहे.

भारताचा जीडीपी १२.५ टक्के होण्याची शक्यता ! – जागतिक नाणेनिधीचा अंदाज

भारताचा विकासदर विक्रमी म्हणजे १२.५ टक्के इतका असेल, असे जागतिक नाणेनिधीने तिच्या अहवालात म्हटले आहे. वर्ष २०२२ पर्यंत जागतिक अर्थव्यवस्था ६.९ टक्क्यांनी  वृद्धींगत होईल, असेही नाणेनिधीने यात म्हटले आहे.

अफगाणिस्तान आणि पाकिस्तान येथे मुलांवर होणारे लैंगिक अत्याचार (बच्चाबाझी) : एक विकृती !

प्रसारमाध्यमे अफगाणिस्तान आणि पाकिस्तान येथील बच्चाबाझीसारख्या गंभीर अत्याचाराविषयी चकार शब्द काढत नाहीत. सार्‍याच बलात्कारी विकृतींचे मूळ एक असते. या राक्षसी प्रवृत्तींकडे दुर्लक्ष करणे घातक आहे !

एप्रिल ते जून या मासांमध्ये भारतातील काही भागांत भीषण उन्हाळा असणार ! – हवामान खात्याचा अंदाज

उत्तर भारतात सध्या उष्माघाताची स्थिती निर्माण झाली आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार दक्षिण भारतातील काही भाग, पूर्व भारतातील काही भाग, तसेच पूर्वोत्तर भागातील तापमान सामान्यपेक्षा अल्प असणार आहे.

८७ टक्के भारतीय उद्योगांचा ‘वर्क फ्रॉम होम’ कायमस्वरूपी चालू ठेवण्याचा विचार !- सर्वेक्षणाचा निष्कर्ष

‘वर्क फ्रॉम होम’ ही पद्धत कायमसाठीच चालू ठेवण्याविषयी ८७ टक्के भारतीय उद्योग गांभीर्याने विचार करत आहेत’, असे बीसीजी (बॉस्टन कन्सल्टिंग ग्रुप) आणि झूम या आस्थापनांनी केलेल्या एका सर्वेक्षणात दिसून आले आहे.

लहान मुलांच्या हातात स्मार्टफोन दिल्याने ती होत आहेत चिडखोर ! – अमेरिकेतील शास्त्रज्ञांचे सर्वेक्षण

विज्ञानाचा असाही एक दुष्परिणाम !

‘डेटिंग’ करणार्‍या गोव्यातील युवकांमध्ये भावनिक हिंसा ही सर्वसाधारण गोष्ट ! – अहवालातील निष्कर्ष

पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण करत केलेली कुठलीही गोष्ट भारतियांची सर्वच स्तरांवर अधोगती करणारीच ठरत आहे.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये २५ लाख लोक बाधित होणार ! – स्टेट बँकेच्या संशोधनाचा निष्कर्ष

भारतीय स्टेट बँकेच्या रिसर्च पॅनेलने ही दुसरी लाट पुष्कळ धोकादायक असण्याची भीती व्यक्त केली आहे. या दुसर्‍या लाटेत २५ लाखांहून अधिक लोक कोरोनाबाधित होण्याची शक्यता वर्तवली आहे.

प्रस्तावित ‘बुलेट ट्रेनसाठी’ सोलापुरात सर्वेक्षण !

मुंबई-भाग्यनगर हे ७११ किलोमीटरचे अंतर केवळ साडेतीन घंट्यांत पार होणार आहे. सध्या हे अंतर पार करण्यासाठी १५ घंटे लागतात. सध्या रेल्वेगाडी ८० ते १२० किलोमीटर वेगाने धावते, तर बुलेट ट्रेनचा वेग ताशी ३२० किलोमीटर असेल.

गेल्या ७ वर्षांत सैन्यातील ८०० सैनिकांची आत्महत्या !

मानसिकदृष्ट्या सक्षम नसणारे सैनिक जनतेचे रक्षण तरी कसे करू शकणार ? सैनिक साधना करत नसल्याने ‘प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्थिर कसे रहायचे’, हे त्यांना ठाऊक नाही. त्यामुळे ते अशा प्रकारचे पाऊल उचलतात !