प्रस्तावित ‘बुलेट ट्रेनसाठी’ सोलापुरात सर्वेक्षण !

प्रतीकात्मक छायाचित्र

सोलापूर – मुंबई-भाग्यनगर या मार्गावर प्रस्तावित असलेली ‘हायस्पीड बुलेट ट्रेन’ सोलापूरमार्गे धावणार आहे. त्यासाठी सोलापुरात सर्वेक्षणाचे काम चालू झाले आहे. पुणे येथील ‘मोनार्क सर्वेअर्स अँड इंजिनिअरिंग कन्सल्टंट’ या आस्थापनास रेल्वेकडून सर्वेक्षणाचे काम देण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यात एकाचवेळी दोन ठिकाणी सर्वेक्षण चालू आहे. यासाठी दोन पथके सिद्ध करण्यात आली असून एक पथक सोलापूरात, तर दुसरे पथक पंढरपूर येथे सर्वेक्षण करत आहे.

भारत सरकारने आखलेल्या ६ नवीन हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरमधील हा ५ वा ‘कॉरिडॉर’ आहे. मुंबई-भाग्यनगर हे ७११ किलोमीटरचे अंतर केवळ साडेतीन घंट्यांत पार होणार आहे. सध्या हे अंतर पार करण्यासाठी १५ घंटे लागतात. सध्या रेल्वेगाडी ८० ते १२० किलोमीटर वेगाने धावते, तर बुलेट ट्रेनचा वेग ताशी ३२० किलोमीटर असेल.