आज देशात होणार्‍या ‘राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणा’साठी महाराष्ट्रातील ७ सहस्र ३३० शाळांची निवड !

केंद्रीय शिक्षण विभागाने देशव्यापी ‘राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण’ करण्याचा निर्णय घेतला असून हे सर्वेक्षण देशभरात येत्या १२ नोव्हेंबर या दिवशी करण्यात येणार आहे. राज्यातील एकूण २ लाख ३४ सहस्र ५५ विद्यार्थी या सर्वेक्षणात सहभागी होणार आहेत.

भारत, अमेरिका यांच्यासह जगात पुरुषांमध्ये अविवाहित रहाण्याचा विचार होत आहे प्रबळ !

भारतात प्रत्येक घंट्याला २७ सहस्र, तर प्रत्येक मासाला ८ लाखांहून अधिक विवाह होत असतात; मात्र भारतासह जगभरात सध्याच्या पुरुषांमध्ये विवाह न करण्याचा विचार प्रबळ होत आहे, असे समोर आले आहे.

पुढील ९ वर्षांत जगातील ९ मोठी शहरे बुडणार !

‘क्लायमेट सेंट्रल’ नावाच्या प्रकल्पाच्या अंतर्गत एका अहवालात म्हटले आहे की, ‘समुद्राच्या पातळीत वाढ झाल्यास सर्वाधिक धोका कोणत्या शहरांना बसेल ?’ याची सूची या अहवालात देण्यात आली आहे. यामध्ये भारतातील कोलकाता शहराचा समावेश आहे.

‘मॅकडोनल्ड्स’, ‘बर्गर किंग’, ‘डॉमिनोज्’, ‘पिझ्झा हट’ आदी आस्थापनांच्या खाद्यपदार्थांमध्ये केला जातो आरोग्याला घातक रसायनांचा वापर ! – अमेरिकेतील संशोधकांचा निष्कर्ष

फास्ट फूडमध्ये वापरली जाणारी रसायने एरव्ही प्लास्टिक नरम ठेवण्यासाठी वापरली जातात. असे खाद्यपदार्थ खाल्ल्यावर त्याचा आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतो.

राजधानी देहलीत वर्ष २०१३ ते २०१९ या कालावधीत गुन्ह्यांमध्ये २७५ टक्क्यांनी वाढ !

वर्ष २०१३ मध्ये एकूण गुन्ह्यांची संख्या ८६ सहस्र ८०० इतकी होती, तर वर्ष २०१९ मध्ये ही संख्या २ लाख ९९ सहस्र ४७५ इतकी झाली. ‘कॅग’च्या अहवालानुसार या वाढत्या गुन्हेगारीमागे कारण आहे, पोलिसांकडे असलेल्या साधनसुविधांची कमतरता !

मालवण शहरासह ग्रामीण भागात लहान मुलांचे सर्वेक्षण करणार्‍या गटाला पोलिसांनी समज देऊन सोडले

देवबाग येथे तरुण-तरुणी यांचा एक गट घरोघरी जात असल्याचे स्थानिकांच्या लक्षात आले. त्यामुळे स्थानिकांनी याविषयी पोलिसांना माहिती दिली अन् या गटाला पोलिसांच्या कह्यात दिले.

खनिकर्म विभागाने आश्वासन देऊनही रेडी गावातील खनिजयुक्त पाण्यामुळे ५ वर्षांपूर्वी हानी झालेल्या शेतकर्‍यांना अद्याप हानीभरपाई नाही !

जनता आपल्या विविध मागण्यांसाठी प्रारंभी निवेदन देत असते, तर प्रसंगी आंदोलन करत असते.

संगणकावर ‘गेम’ खेळण्याचा आणि त्यात भवितव्य (करियर) घडवण्याचा तरुणाईचा वाढता कल !

तरुण पिढीला धर्मशिक्षण न दिल्यामुळेच ती संगणकीय खेळ खेळण्याच्या विकृतीकडे ओढली गेली आहे. ‘साधना करणे’ हाच आनंदी जीवन जगण्याचा आणि सकारात्मक, तसेच तणावरहित विचार करण्याचा मूलमंत्र आहे’, हे तरुणाईवर बिंबवले पाहिजे.

गिरी येथील पूरसदृश स्‍थितीची मुख्‍यमंत्री डॉ. सावंत यांनी केली पहाणी : शेतकर्‍यांना हानीभरपाई देण्‍याची घोषणा

राज्‍यात ५ ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद