वादग्रस्त पालिका अध्यादेश अखेर शासनाकडून मागे

गोवा शासनाने अखेर वाढत्या विरोधाच्या पार्श्‍वभूमीवर गोवा नगरपालिका (दुरुस्ती) अध्यादेश २०२० मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाच्या कायदा विभागाने हा अध्यादेश मागे घेतल्यासंबंधी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. अखिल गोवा व्यापारी संघटनेने गोवा शासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

नॅशनल मायग्रंट सपोर्ट पोर्टलचा शुभारंभ

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी २२ जानेवारी या दिवशी मुख्यमंत्री निवासस्थानी झालेल्या एका कार्यक्रमात नॅशनल मायग्रंट सपोर्ट पोर्टलचा शुभारंभ केला. राज्यात येणार्‍या स्थलांतरित कामगारांचे प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी या योजनेचा लाभ होणार आहे. वेबिनारच्या माध्यमातून हा कार्यक्रम झाला.

नोकरीचे आमीष दाखवून युवतीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी आरोपीला पोलीस कोठडी

नोकरीला लावण्याचे आमीष दाखवून युवतीवर बलात्कार करणारा रतन विष्णु कांबळे (रहाणार नागवे रोड, कणकवली) याला येथील न्यायालयाने २७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी बजावली आहे.

सावंतवाडी नगरपरिषदेने व्यवसायासाठी जागा द्यावी आणि कह्यात घेतलेले साहित्य परत द्यावे, यासाठी रवि जाधव यांचे उपोषण ४ थ्या दिवशीही चालू

नगरपरिषदेने गाळा हटवून त्यातील साहित्य अवैधरित्या कह्यात घेतले, असा आरोप रवि जाधव यांनी केला असून याच्या विरोधात त्यांनी सहकुटुंब उपोषण चालू केले आहे.

विरोध होणारे प्रकल्प राबवल्यास सरकारच्या विरोधात असहकार मोहीम छेडू ! – गोंयात कोळसो नाका संघटना

लोहमार्ग, महामार्ग दुपदरीकरण आणि तम्नार वीज प्रकल्प हे तीनही प्रकल्प राबवण्यावर गोवा शासन ठाम राहिल्यास असहकार मोहीम छेडण्याची चेतावणी गोंयात कोळसो नाका या अशासकीय संघटनेने दिली आहे.

देशद्रोहाचा गुन्हा असलेली रिव्हॉल्युशनरी गोवन्स विधानसभेच्या सर्व जागा लढवणार

अशासकीय संस्था आणि देशद्रोहाचा ठपका असलेल्या रिव्हॉल्युशनरी गोवन्सचे चालू मासाच्या अखेरीस राजकीय पक्षात रूपांतर होणार आहे, अशी घोषणा रिव्हॉल्युशनरी गोवन्सचे मनोज परब यांनी केली.

केंद्रीय कृषी कायद्यांविषयी काँग्रेस आणि त्यांचे सहकारी पक्ष अपप्रचार करत आहेत ! – राजकुमार चहर, अध्यक्ष, किसान मोर्चा, भाजप

राजकुमार चहर पुढे म्हणाले, कृषी कायद्यामुळे गोव्यासह सर्व देशाला लाभ मिळणार असल्याचे आगामी काळात सिद्ध होणार आहे.

मडगाव येथून २ अल्पवयीन मुलींचे अपहरण : पोलीस संशयित धर्मांधाच्या शोधात

चंद्रावाडो, फातोर्डा येथून १६ वर्षीय २ मुलींचे अपहरण करण्यात आले आहे. या प्रकरणी मडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. पोलीस सध्या संशयित आरोपी मौलवी अब्दुल देवगिरी याच्या शोधात आहेत.

तांडव वेब सिरीजवर त्वरित बंदी घाला ! – गोवा सुरक्षा मंच

हिंदूबहुल देशात देवतांची विटंबना करणार्‍या कलाकृतींवर बंदी घालण्याची मागणी करावी लागणे प्रशासनाला लज्जास्पद !

उबेर मोटो या दुचाकी टॅक्सी अ‍ॅपवर वाहतूक खाते कारवाई करणार

राज्यात उबेर मोटो हे दुचाकी टॅक्सी अ‍ॅप अनधिकृतपणे कार्यरत असल्याची माहिती वाहतूक खात्याला मिळाली आहे. वाहतूक खात्याने डमी ग्राहकाच्या माध्यमातून उबेर मोटोवर कार्यरत असलेल्या दुचाकीचालकाचे संभाषण ध्वनीमुद्रित केले आहे.