वास्को येथे १० वी इयत्तेतील २ विद्यार्थी कोरोनाबाधित

एका विद्यालयातील २ विद्यार्थी कोरोनाबाधित झाले आहेत. हे दोन्ही विद्यार्थी एकाच वर्गात शिकत होते. यामुळे विद्यालयाचे नियमित वर्ग पुढील काही दिवसांसाठी रहित करण्यात आले आहेत.

कृषी कायद्यातील सुधारणांचा पुरस्कार करणारे पवार खरे कि आंदोलनाला पाठिंबा देणारे पवार खरे ? – भाजप

केवळ काँग्रेसच्या दबावाखाली येऊन राज्य सरकारसाठी शेतकरी हितापेक्षा सत्ता राखणे आणि राजकारण करणे महत्त्वाचे आहे, हे स्पष्ट होते.

सीरमला लागलेल्या आगीच्या चौकशीनंतरच अपघात कि घातपात हे स्पष्ट होईल ! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सीरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीविषयी चौकशी केली जात आहे. त्यानंतरच हा अपघात होता कि घातपात हे स्पष्ट होईल. त्याआधी कोणताही निष्कर्ष काढणे योग्य रहाणार नाही, असे नमूद करतांनाच ज्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे, त्यांचे पूर्ण दायित्व आस्थापनाने घेतले आहे.

धनंजय मुंडे यांच्याविरोधातील बलात्काराची तक्रार मागे

चित्रपटात काम मिळवून देतो असे सांगून धनंजय मुंडे यांनी आपले लैंगिक शोषण केल्याचा आरोप एका महिलेने केला होता. बलात्काराच्या आरोपांमुळे मुंडे अडचणीत आले होते.

‘तांडव’ वेबसिरीजवर तात्काळ बंदी घालावी !

‘तांडव’ या वेबसिरीजमध्येे कोट्यवधी हिंदूंचे आराध्यदैवत भगवान शिव आणि भगवान श्रीराम यांचा अवमान आणि विटंबना केली आहे. या वेबसिरीजवर तात्काळ बंदी घालावी, या मागणीचे निवेदन येथील जिल्हाधिकारी कार्यालय येथे देण्यात आले.

श्री विठ्ठल दर्शनासाठी ऑनलाईन दर्शन पास बुकींगची आवश्यकता नाही

ओळखपत्र दाखवून भाविकांना मंदिरात प्रवेश देण्यास प्रारंभ

‘गोवा लोकायुक्त’ कायद्यातील सुधारणांमुळे ‘लोकायुक्त’ची ताकद घटणार नाही, तर पात्रतेसंबंधी प्रश्‍नावर तोडगा निघेल !

‘गोवा लोकायुक्त’ कायद्यात पालट करण्यास आणि उपलोकायुक्त पदासाठीची पात्रता शिथिल करण्यास गोवा मंत्रीमंडळाने नुकतीच मान्यता दिली आहे. आगामी विधानसभा अधिवेशनात कायद्यातील बर्‍याच कलमांमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे.

‘तांडव’ वेब सिरीजवर तात्काळ बंदी घाला ! – हिंदु जनजागृती समितीचे उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन

मंत्री शहा आणि जावडेकर यांना देण्यासाठीचे निवेदन समितीच्या शिष्टमंडळाने येथील उपजिल्हाधिकारी श्रीमती शुभांगी साठे यांना दिले. या वेळी समितीचे सर्वश्री गजानन मुंज, सुरेश दाभोळकर, रामकृष्ण कुलकर्णी आणि रवींद्र परब उपस्थित होते.

राष्ट्रीयीकृत बँकांनी मराठीतून व्यवहार करण्याची सावंतवाडी येथील प्रांताधिकार्‍यांची सूचना

मराठी पत्रकारदिनानिमित्त मनसेच्या वतीने बँकांमध्ये मराठीचा वापर करण्याविषयी निवेदन दिले होते. याची नोंद घेत येथील प्रांताधिकाऱ्यांनी ‘सर्व राष्ट्रीयीकृत बँकांनी त्यांचे व्यवहार मराठीतून करावेत’, अशी सूचना सर्व बँकांना दिली आहे.

देशद्रोहाच्या गुन्ह्यावरून ‘रिव्हॉल्युशनरी गोवन्स’च्या पदाधिकार्‍यांचे गुन्हे अन्वेषण विभागाकडून अन्वेषण

‘सपोर्टर्स ऑफ रिव्हॉल्युशनरी गोवन्स’ या ‘फेसबूक पेज’वर ‘गोवा’ भारतापासून निराळे करता येऊ शकते का ?’, असा प्रश्‍न उपस्थित केला होता. या प्रकरणी संशयित लेस्टर अफोन्सो आदींच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा प्रविष्ट केला होता.