मालवण-ओरोस एस्.टी. बसवर आनंदव्हाळ येथे दगडफेक
या वेळी बसमध्ये चालक आणि वाहक यांच्यासह १३ प्रवासी होते; सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही. असे असले, तरी बसगाडीच्या काचा फुटल्या.
या वेळी बसमध्ये चालक आणि वाहक यांच्यासह १३ प्रवासी होते; सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही. असे असले, तरी बसगाडीच्या काचा फुटल्या.
नव्याने संसर्ग होत असलेल्या ‘ओमिक्रॉन’ या कोरोनाच्या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे. जिल्ह्यात येणार्या विदेशी पर्यटकांची तपासणी करण्यात येत आहे.
वेंगुर्ला तालुक्यातील समुद्रात मोठ्या प्रमाणात प्रकाशझोतात, तसेच पर्ससीन नेटचा वापर करून यांत्रिक नौका मासेमारी करत असल्याची तक्रार स्थानिक मासेमारांनी दिली होती.
‘व्हेल’ माशाच्या उलटीचा व्यापार करण्यास भारतात बंदी आहे. तरीही गोवा राज्यातून तस्करीसाठी आणलेली ‘व्हेल’ माशाची उलटी (अॅम्बरग्रीस) स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने तालुक्यातील बांदा येथील गांधीचौक येथे कह्यात घेतली.
तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री भराडीदेवीचा वार्षिक जत्रोत्सव रविवार, १२ डिसेंबर २०२१ या दिवशी सकाळी देवीचा कौल घेऊन परंपरेनुसार जत्रोत्सवाचा दिनांक ठरवण्यात आला.
नौदलातील ‘एम्.आय.जी. २९ के’ या विमानाच्या देखभाल-दुरुस्तीची सुविधा भारतात नव्हती. ते रशियाकडून करून घेतले जात होते. विमानांसाठी सर्व सुविधा भारतात निर्माण करण्याविषयी लेफ्टनंट कमांडर सूरज यांनी प्रयत्न केला आणि त्यात ते यशस्वी झाले !
पालकमंत्र्यांनी संबंधित ठेकेदार आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला अन् ‘येत्या १० दिवसांत रस्त्याच्या कामाला प्रारंभ केला जाईल’, असे आश्वासन दिले.
हिंदूंची असुरक्षित मंदिरे ! सावंतवाडी तालुक्यातील शेर्ले गावातील श्री रवळनाथ मंदिरातील दानपेटी अज्ञात चोराने फोडून त्याताल रोख रक्कम चोरली.
अशी चेतावणी का द्यावी लागते ? प्रशासनाला अतीक्रमण झालेले दिसत नाही कि चिरेखाण व्यावसायिकांशी प्रशासनातील संबंधितांचे आर्थिक लागेबांधे आहेत ?
ओबीसीचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रहित केल्याने महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने ‘ओबीसी’च्या जागा वगळता उर्वरित जागांवर निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत, तर ‘ओबीसी’साठी आरक्षित प्रभागातील निवडणूक स्थगित केली आहे.