‘नागरिकांचा मागास प्रवर्ग’ यासाठीचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रहित केल्याचे प्रकरण
सिंधुदुर्ग – ‘नागरिकांचा मागास प्रवर्ग’ यासाठीचे (ओबीसीचे) आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रहित केल्याने महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने ‘ओबीसी’च्या जागा वगळता उर्वरित जागांवर निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत, तर ‘ओबीसी’साठी आरक्षित प्रभागातील निवडणूक स्थगित केली आहे.
(सौजन्य : महा 24 News)
निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात २ निवडणुका न घेता सध्या चालू असलेल्या नगरपंचायत, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायती यांच्या पोटनिवडणुका यांची प्रक्रियाच रहित करावी अन् निवडणूक कार्यक्रम रहित करून नवीन निवडणूक कार्यक्रम घोषित करावा, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा वंचित बहुजन आघाडी आणि ‘ओबीसी’ समाज संघटना यांच्या वतीने करण्यात आली आहे. याविषयी राज्यपालांना देण्यासाठीचे निवेदन या संघटनांच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांना दिले.