हिंदूंची असुरक्षित मंदिरे !
सावंतवाडी – तालुक्यातील शेर्ले गावातील श्री रवळनाथ मंदिरातील दानपेटी अज्ञात चोराने फोडून त्याताल रोख रक्कम चोरली. मंदिराच्या मुख्य दाराची कडी ९ डिसेंबरला रात्री ९.३० ते १० डिसेंबरला सकाळी ८.३० या कालावधीत चोराने तोडली आणि मंदिराच्या गाभार्यात असलेली दानपेटी फोडून त्यातील रक्कम चोरली. १० डिसेंबरला सकाळी येथील प्रदीप ठाकूर हे पूजा करण्यासाठी मंदिरात गेल्यावर दानपेटी फोडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी देवस्थानचे मानकरी अरुण धुरी यांना याची माहिती दिल्यानंतर बांदा पोलीस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली.