भीमा नदीपात्रात प्रभु श्रीराम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची साकारण्यात आली प्रतिकृती !

छत्रपती शिवराय आणि प्रभु श्रीराम या योद्ध्यांचा पराक्रम अनमोल आहे. यासाठी त्यांच्या प्रतिकृती साकारण्यात आल्या असल्याचे नगरे यांनी सांगितले. प्रतिकृतींच्या दर्शनासाठी भोई समाजाच्या वतीने विनामूल्य होडीची व्यवस्था करण्यात आली आहे.

सदोष लोकशाही आणि त्यासंदर्भात काही न करणारे झोपी गेलेले मतदार !

भारतात राजेशाही अस्तित्वात होती आणि ती जनहितकारी अन् जनतेचा पितृवत् सांभाळ करणारी होती. त्या वेळची राज्यव्यवस्था इतकी वैभवसंपन्न असायची की, भारतात ‘सोन्याचा धूर निघत असे’, असे म्हटले जायचे.’

‘रामचरितमानस’वर बंदी घाला !

गेली ५०० वर्षे हा ग्रंथ संपूर्ण जगभरात पूजनीय ठरलेला असतांना आणि त्‍याच्‍यामुळे कधीही कुठेही कोणताही हिंसाचार झालेला नसतांना अशा प्रकारची विधाने करून सवंग लोकप्रियता मिळवण्‍याचाच हा प्रयत्न आहे !

‘सेतूसमुद्रम्’ प्रकल्‍प रोखा !

‘केंद्रशासनाने रामसेतूला राष्‍ट्रीय स्‍मारक घोषित करण्यास विलंब केला, तर ज्‍याप्रमाणे राममंदिराच्‍या बांधकामासाठी हिंदूंना रस्‍त्‍यावर उतरावे लागले होते, तोच भाग रामभक्‍तांंना येथेही करावा लागेल. असे होण्‍यापेक्षा केंद्राने रामसेतूला हानी पोचवू शकणार्‍या या प्रकल्‍पालाच पूर्णविराम देऊन हिंदूंच्‍या धर्मश्रद्धा जपाव्‍यात, हीच अपेक्षा !

व्‍यक्‍ती, समाज, निसर्ग आणि परमात्‍मा यांच्‍यात संतुलन साधणे म्‍हणजे धर्म ! – प.पू. स्‍वामी गोविंददेव गिरि महाराज

अयोध्‍येतील श्रीराम मंदिराचे काम जानेवारी २०२४ मध्‍ये पूर्ण होणार ! – प.पू. स्‍वामी गोविंददेव गिरि महाराज

काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांचे बोलणे ताळतंत्र सुटलेले आणि पोरकटपणाचे !

सलमान खुर्शीद हे काँग्रेसचे नेते आहेत. व्यवसायाने ते अधिवक्ता आहेत. त्यांना कायदा आणि न्यायशास्त्र यांचे चांगले ज्ञान आहे. त्यामुळे राहुल गांधी यांची प्रभु श्रीरामांशी तुलना करतांना त्यांनी ज्या निकषावर तुलना केली, ते पहाता ‘यांच्यासारख्या कायदेतज्ञाने ताळतंत्र सोडला’, असे म्हणावे लागेल

रहावे नित्य स्मरण रामास माझे ।

‘१७.१२.२०२२ या दिवशी मला अंगरख्याला (शर्टला) गुंडी शिवायची होती; पण काही केल्या दोरा सुईत ओवला जात नव्हता. तेव्हा मी मनात श्रीकृष्णाचा जप करत होतो. अकस्मात् मला प्रभु रामचंद्राची आठवण आली आणि लगेच दोरा ओवला गेला. भगवंताने मला रामनामाचे महत्त्व पुन्हा एकदा समजावले. त्याच्या या असीम कृपेसाठी मी त्याच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे. त्या प्रसंगावरून स्फुरलेले … Read more

पितृसेवा आणि आज्ञापालनाच्या व्रताचरणाचे रहस्य

पूर्वी सायंकाळच्या वेळी देवाजवळ दिवा लावून प्रार्थना म्हणून झाली की, घरातील लहान मुले सर्व वडिलधार्‍या मंडळींना खाली वाकून नमस्कार करत असत. प्रतिदिन वाकून नमस्कार करण्याचे संस्कार अगदी बालवयापासूनच आग्रहपूर्वक करावे लागतात.

प्रभु श्रीरामचंद्र आणि बिभीषण यांची प्रथम भेट

पौष शुक्ल चतुर्थी या तिथीला प्रभु श्रीरामचंद्र आणि बिभीषण यांची भेट झाली. त्या निमित्ताने…

रामसेतूसारखी रचना पूर्वी अस्तित्वात असल्याचे संकेत !

केंद्र सरकारचे संसदेत विधान ! ‘रामसेतू’ असल्याचे मानले जाते त्या ठिकाणची उपग्रहांद्वारे छायाचित्रे काढण्यात आली आहेत. सोप्या शब्दांत सांगायचे, तर खरे रूप तेथे आहे, हे सांगणे अवघड आहे. तथापि असे काही संकेत आहेत, जे सूचित करतात की, अशा प्रकारची रचना तेथे अस्तित्वात असू शकते.