छत्रपती शिवाजी महाराज यांचा अनादर खपवून घेणार नाही ! – रविकिरण इंगवले, शिवसेना

इंगवले यांनी प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानचे दैवत असून त्यात कर्नाटक आणि महाराष्ट्र असा भेदभाव करणे चुकीचे आहे.”

म्हैशाळ (जिल्हा सांगली) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस शिवसेनेकडून दुग्धाभिषेक !

बेंगळुरू येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचे प्रकरण !

तमिळनाडूचे शिवसेनेचे प्रदेशाध्यक्ष राधाकृष्णन् यांचा भाजपमध्ये प्रवेश

ते अध्यात्मविरोधी, राष्ट्रवादविरोधी आणि हिंदीविरोधी आहेत. आम्ही काँग्रेस आणि द्रमुक यांच्या हाताखाली काम करू शकत नाही. शिवसेनेच्या वरिष्ठांना हे ठाऊक आहे की, आम्ही निराश आहोत. त्यामुळे आतापासून मी भाजपचा माणूस आहे, शिवसेनेचा नाही.

बेळगावमध्ये पोलीस प्रशासनाची मराठी भाषिकांविरोधात दडपशाही !

बेंगळुरू येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचे प्रकरण ! बेळगाव पोलिसांची दडपशाही चालू असून ऐन मध्यरात्री २७ जणांना अटक तर ६१ जणांवर गुन्हे नोंद ! यात काही अल्पवयीन युवकांचाही समावेश !

‘इस्लामपूर’चे नामकरण ‘ईश्वरपूर’ करावे या मागणीसाठी शिवसेनेचे पालिकेसमोर जोरदार शक्तीप्रदर्शन !

या आंदोलनाच्या निमित्ताने स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली होती. या एकत्र केलेल्या स्वाक्षर्‍या घेऊन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री. आनंदराव पवार यांनी शिवसैनिकांसहपालिकेवर जोरदार शक्तीप्रदर्शन करत धडक मारली.

अनिल परब हे शिवसेनेच्या मुळावर उठले आहेत ! – रामदास कदम, शिवसेना

अनिल परब हे शिवसेनेच्या मुळावर उठले आहेत, असा गंभीर आरोप शिवसेनेचे खेड (जिल्हा रत्नागिरी) येथील नेते रामदास कदम यांनी १८ डिसेंबर या दिवशी पत्रकार परिषदेत केला.

‘पुतळ्याची विटंबना ही छोटी गोष्ट असून त्यामुळे दगडफेक करणे, शांतताभंग करणे चुकीचे !’

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचे धाडस भाजपच्या राज्यात होते, हे हिंदूंना अपेक्षित नाही ! सरकारचा धर्मांध आणि समाजकंटक यांच्यावर वचक असला पाहिजे !

धर्मादाय रुग्णालयांच्या मुख्य फलकावर ‘धर्मादाय’ असा उल्लेख आणि रुग्णांसाठीच्या योजनांचे फलक दर्शनी भागात लावण्यात यावेत !

या मागणीचे निवेदन आरोग्य साहाय्य समितीच्या वतीने धर्मादाय उपायुक्त यांना देण्यात आले. त्यांनी याची पडताळणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे चौक’ सुशोभिकरणाचे काम अंतिम टप्प्यात ! – नितीन शिंदे, माजी आमदार

या कामाची पाहणी करण्यासाठी माजी आमदार नितीन शिंदे, रावसाहेब खोजगे, प्रसाद रिसवडे, सागर शिंदे, प्रथमेश वैद्य, अशोक पाटील, रमेश सूर्यवंशी, सुरेश पवार, दीपक वाघमारे, सुरेश सपकाळ, अंकुश ठोंबरे, राजेश घाडगे उपस्थित होते.

एकीकडे खासदार निधी बंद असतांना केंद्र सरकारने स्वतःच्या प्रसिद्धीसाठी मात्र खर्च केले १ सहस्र ६९८ कोटी रुपये ! – खासदार श्रीकांत शिंदे यांची लोकसभेत टीका

केंद्र सरकार प्रतिवर्षी सरासरी ६०० कोटी रुपयांचा खर्च केवळ स्वतःच्या  प्रसिद्धीसाठी करत आहे – शिवसेनेचे ठाणे येथील खासदार डॉ. श्रीकांत शिंदे