तळजाई टेकडीवरील जैवविविधता नष्ट होऊ देणार नाही ! – शिवसेना उपनेते सचिन अहिर

शहरांचा विकास करतांना निसर्गामधील विविध घटकांचा समतोल राखणे आवश्यक आहे. पर्यावरणाची हानी होऊ न देता त्याची काळजी घ्यायला हवी. तळजाई टेकडी म्हणजे पुण्याचा महत्त्वाचा भाग असल्याने तेथील जैवविविधता नष्ट होऊ देणार नाही.

काश्मीरमधील हिंदूंच्या हत्या आणि सैनिकांचे हौतात्म्य यांच्या पार्श्वभूमीवर भारत-पाक यांच्यातील ‘टी-२०’ क्रिकेट विश्वचषकातील सामना रहित करा ! – समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे निवेदन

२४ ऑक्टोबर या दिवशी होणारा ‘टी-२०’ विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना रहित करावा, या मागणीचे पंतप्रधानांच्या नावे असलेले निवेदन समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांना २० ऑक्टोबर या दिवशी देण्यात आले.

सांगोला साखर कारखान्याची निवडणूक लढवण्यासाठी ५७ लाख रुपये वाटले !

केवळ साखर कारखान्याची निवडणूक लढवण्यासाठी लाखो रुपये वाटावे लागत असतील, तर नगरसेवक, आमदार, खासदार या पदांच्या निवडणुकांसाठी किती रुपयांचे वाटप होत असेल, याची कल्पना येते. पैसे वाटून निवडून येणारे उमेदवार कधी विधायक कार्य करू शकतील का ?

आर्यन खान याच्या समर्थनार्थ शिवसेनेचे नेते किशोर तिवारी यांची सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट !

अमली पदार्थ प्रकरणात अटकेत असलेला चित्रपट अभिनेता शाहरूख खान यांचा मुलगा आर्यन खान याच्या समर्थनार्थ येथील शिवसेनेचे नेते किशोर तिवारी यांनी सर्वोच्च न्यायालयात ‘ई-मेल’द्वारे याचिका प्रविष्ट केली आहे.

बांगलादेश येथील दंगलखोर मुसलमानांवर कठोर कारवाई व्हावी !

हिंदूंवर आक्रमण करणार्‍या दंगलखोर मुसलमानांवर कठोर कारवाई होण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी हस्तक्षेप करावा, अशा मागणीचे पंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री यांच्या नावे असलेले निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आजरा येथे तहसीलदार विकास आहिर यांना देण्यात आले.

भाजपचे १५-२० नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात ! – यशवंत जाधव, स्थायी समिती सदस्य, शिवसेना, मुंबई महानगरपालिका

मुंबईतील नगरसेवक भाजपच्या नेतृत्वाला कंटाळले आहेत. त्यामुळे ते शिवसेनेमध्ये येण्याच्या सिद्धतेत आहेत. भाजपचे १५-२० नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात आहेत, असे वक्तव्य मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे सदस्य यशवंत जाधव यांनी १८ ऑक्टोबर या दिवशी पत्रकार परिषदेत केले.

शिवसेनेचा भगवा फडकावण्यासाठी एकजुटीने काम करा ! – आमदार वैभव नाईक यांचे शिवसैनिकांना आवाहन

१६ ऑक्टोबरला जानकी मंगल कार्यालय येथे आमदार वैभव नाईक, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद प्रशासनाच्या विरोधात शिवसेनेचे सदस्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेणार

जिल्हा प्रशासन आणि पदाधिकारी संगनमताने काम करत असल्याचा आरोप

संभाजीनगर येथील कर्णपुरादेवी मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा द्यावा !  – अंबादास दानवे, आमदार, शिवसेना 

‘प्रतिवर्षी कर्णपुरा येथील बालाजीच्या रथाची मिरवणूक दसर्‍याच्या दिवशी काढली जाते; मात्र कोरोनामुळे ही मिरवणूक गेल्या वर्षीपासून रहित करण्यात आली आहे’, अशी माहिती मंदिराचे पुजारी आमदार अंबादास दानवे यांनी दिली.

हिंदूंसाठी सुरक्षित वातावरण निर्माण व्हावे, यासाठी भारतात धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना होणे आवश्यक ! – पू. नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक, हिंदु जनजागृती समिती

गेल्या ७४ वर्षांत भारतात अल्पसंख्यांकांचे प्रचंड लांगूलचालन केल्यामुळे हिंदू बहुसंख्य असूनही त्यांना घटनात्मक संरक्षण मिळालेले नाही. मदरशांमध्ये कुराण शिकवण्यासाठी ‘सेक्युलर’ (निधर्मी) सरकार अनुदान देते; मात्र हिंदूंना त्यांच्या धर्माचे शिक्षण देण्यासाठी विरोध केला जातो. हिंदूंची मंदिरे सेक्युलर सरकार चालवते..