बेंगळुरू येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचे प्रकरण !

मिरज, २० डिसेंबर (वार्ता.) – बेंगळुरू येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्या सीमेवर असलेल्या म्हैशाळ येथे शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस दुग्धाभिषेक करून कर्नाटक सरकारचा निषेध करण्यात आला. या वेळी शिवसेना मिरज तालुकाउपप्रमुख बबन कोळी, कुबेरसिंह राजपूत, उपविभाग प्रमुख शिवाजी म्हेत्रे, संजय फडतरे, पिंटू पाटील, मिरज शहरउपप्रमुख बाळासाहेब हात्तेकर यांसह अन्य उपस्थित होते.
कोल्हापुरात शिवसैनिकांनी कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला !
कोल्हापूर, २० डिसेंबर (वार्ता.) – कोल्हापुरात शिवसैनिकांनी कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. या वेळी जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, तालुकाप्रमुख वैभव उगळे, उपजिल्हाप्रमुख मधुकर पाटील, शहरप्रमुख बाबासाहेब सावगावे, आप्पासाहेब मामा नाईक, महिला आघाडी जिल्हाप्रमुख मंगल चव्हाण, वैशाली जुगळे, आण्णासाहेब भिलोरे यांसह अन्य उपस्थित होते.
मुंबईत उंदरांनी कुरतडलेली फळे ग्राहकांना दिली जात असल्याचा आरोप !
Sant Balumama Devasthan Scam : तत्कालीन धर्मादाय निरीक्षक रागिणी खडके यांच्यासह कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा नोंद !
बिबवेवाडीतील (पुणे) रस्त्यावरील शोभिवंत १०० दिवे चोरीला !
महापालिकेतील उपायुक्तांचा पुतण्या असल्याचे सांगून फसवणूक करणारा कह्यात !
श्री क्षेत्र तपोभूमी गुरुपीठावरील बटूंच्या यशाची मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याकडून नोंद
मुंबई उच्च न्यायालयाकडून वर्ष २०१३ मधील ३५ सहस्र कोटी रुपयांच्या खाण घोटाळ्यासंबंधीचा गुन्हा रहित