पेशावरमधून ६० टक्के शिखांचे इस्लामी कट्टरतावाद्यांकडून होणार्‍या नरसंहारामुळे पलायन

येथील शीख धर्मियांवर सातत्याने इस्लामी कट्टरतावाद्यांकडून आक्रमणे होऊ लागल्याने ३० सहस्र शिखांपैकी ६० टक्के शिखांनी (१८ सहस्र शिखांनी) अन्य देशांत पलायन केले आहे. काही जण भारतात शरणार्थी म्हणून रहात आहेत.

पाकिस्तानने भारतीय शीख तीर्थयात्रेकरूंना दूतावास अधिकार्‍यांशी भेटण्यापासून रोखले

भारतीय दूतावासातील अधिकार्‍यांना भारतातून पाकिस्तानमध्ये पोहोचलेल्या शीख तीर्थयात्रेकरूंना भेटण्यास मनाई केली आहे, तसेच या यात्रेकरूंसह असणारी एक बैठकही घेण्यास पाकने विरोध केला.

मशिदीसाठी हिंदूंनी भूमी दान केली, तर शिखांनी वर्गणी गोळा केली

पंजाबमधील बरनाला जिल्ह्यातील मूम गावातील हिंदु ब्राह्मणांनी मशिदीसाठी भूमी दान केली. याशिवाय शिखांनी मशीद उभारण्यासाठी लोकवर्गणी गोळा केली.

मुंबईत खलिस्तानी आतंकवाद्याची कॅनडाच्या पंतप्रधानांच्या पत्नीशी भेट

खलिस्तानी आतंकवादी तथा पंजाबमधील मंत्र्याच्या हत्येचा कट रचल्याच्या प्रकरणी दोषी ठरलेला जसपाल अटवाल आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांची पत्नी सोफी ट्रुडो यांचे छायाचित्र प्रसिद्ध झाले आहे.

शीखविरोधी दंगल प्रकरणी १८६ खटल्यांची फेरपडताळणी होणार

वर्ष १९८४ मध्ये झालेल्या शीखविरोधी दंगलीच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने विशेष अन्वेषण पथकाची स्थापना केली आहे. हे पथक १८६ खटल्यांची फेरपडताळणी करणार आहे.

खलिस्तानचा धोका !

खलिस्तान चळवळीला पुनरुज्जीवित करण्याचे काम पाकिस्तानी गुप्तचर संघटना इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स अर्थात् आयएस्आय करत असल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी राज्यसभेत नुकतीच दिली.

पाकमधील शिखांच्या बळजोरीने होणार्‍या धर्मांतराविषयी पाकशी बोलणार ! – सुषमा स्वराज

पाकमधील हंगू जिल्ह्यातील शीख समुदायाला बळजोरीने इस्लाम स्वीकारायला भाग पाडले जात असल्याच्या वृत्ताची आपण गंभीर दखल घेतली असून याविषयी आपण पाकशी बोलणी करणार आहोत.

पंजाबमधून आयएस्आयच्या हस्तकाला अटक

पाकची गुप्तचर संस्था आयएस्आयसाठी काम करणार्‍या गुरुमुख सिंह या तरुणाला पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. भारतीय सैन्याची माहिती पाकला पुरवल्याचा आरोप त्याच्यावर आहे. गुरुमुख सिंह पाकमध्ये जाऊन आला आहे.

जालियनवाला हत्याकांड लाजिरवाणेच !

भारतावर ब्रिटिशांची सत्ता असतांना झालेले जालियनवाला बाग हत्याकांड ही घटना अत्यंत लाजिरवाणी आणि निषेधार्हच आहे.

ब्रिटीश सरकारने जालियनवाला बाग हत्याकांडासाठी क्षमा मागावी ! – लंडनचे महापौर सादिक खान

ब्रिटीश सरकारने वर्ष १९१९ मध्ये झालेल्या जालियनवाला बागेतील हत्याकांडासाठी क्षमा मागायलाच हवी. या घटनेसाठी क्षमा मागण्याची वेळ आली आहे, असे मत लंडनचे महापौर सादिक खान यांनी व्यक्त केले.


Multi Language |Offline reading | PDF