लाहोर (पाकिस्तान) – जर्मनीत रहाणार्या भारतीय वंशाच्या ३८ वर्षीय शीख महिलेने पाकिस्तानी पुरुषाशी लग्न केले. विवाहासाठी तिने स्वतःचा धर्म आणि नावही पालटले आहे. यासंदर्भात मशिदीच्या इमामाकडून धर्मांतराचे प्रमाणपत्रही देण्यात आले आहे. आतापर्यंत जसप्रीत कौर या नावाने ओळखल्या जाणार्या या महिलेचे आता झैनब असे नामांतर करण्यात आले आहे.
१. जसप्रीत कौर ही पंजाबमधील लुधियाना येथील रहिवासी असून तिचे लग्न पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील अली अर्सलान नावाच्या मुसलमान तरुणाशी झाले आहे. लग्नापूर्वी तिने पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील सियालकोट येथील जामिया हनफिया मशिदीत इस्लाम धर्म स्वीकारला. जामिया हनाफिया मशिदीच्या प्रशासकांनी सांगितले की, जसप्रीत कौर ही आमच्या संस्थेत इस्लाम धर्म स्वीकारलेल्या २ सहस्रांहून अधिक मुसलमानेतरांपैकी एक आहे.
२. जसप्रीत कौर आणि अली अर्सलान यांची ओळख जर्मनीमध्ये असतांना झाली. यानंतर अर्सलानने जसप्रीत कौरला पाकिस्तानात येण्याचे निमंत्रण दिले. यानंतर जसप्रीत कौरने पाकिस्तानात जाऊन धर्मांतर केले.
संपादकीय भूमिकाखलिस्तानवादी अशा घटनांचा कधी विरोध करतील का ? |